SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मारुती स्विफ्ट कार सुरक्षेबाबत ठरली कुचकामी, टाटा मोटर्सने उडविली खिल्ली, पाहा नेमकं काय झालं..?

मारुती स्विफ्ट.. भारतीयांची आवडती कार. मात्र, सुरक्षेबाबत ही कार कुचकामी ठरल्याचे नुकतेच समोर आलेय. त्यामुळे ग्राहकांमध्येही या कारबाबत संशयाचे धुके गडद झाले आहे. त्याचा या कार विक्रीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लॅटिन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (NCAP) तर्फे नुकतीच मारुती सुझुकी स्विफ्ट कारची ‘क्रॅश-टेस्ट’ करण्यात आली. त्यात ‘सुरक्षा वॉचडॉग’कडून या कारला ‘शून्य-स्टार रेटिंग’ मिळाले. चाचणी केलेली कार गुजरात मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये बनविली होती, म्हणजेच ती ‘मेड इन इंडिया’ कार आहे.

Advertisement

स्विफ्ट कारला ‘अॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन’ बाबत 15.53 टक्के रेटिंग मिळाले, तर लहान मुलांच्या सुरक्षेबाबत 0 टक्के रेटिंग मिळाले. पादचारी सुरक्षेसाठी 6.98% (3 पॉइंट) मिळाले आहेत.

Advertisement

चाचणीदरम्यान कारचा दरवाजा उघडल्याने UN95 नियमन पूर्ण होणार नाही. ‘वॉचडॉग’च्या अहवालानुसार, युरोपमध्ये स्विफ्ट 6 एअरबॅग आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोलसह (ईएससी) स्टँडर्ड म्हणून विकली जाते. लॅटिन अमेरिकेतील मॉडेल साइड बॉडी आणि हेड एअरबॅग, ईएससी स्टँडर्डसह दिले जात नाही.

कशामुळे झाली फेल..?

Advertisement
  • खराब साइड इफेक्ट प्रोटेक्शन
  • कमी व्हिप्लॅश स्कोअर
  • स्टँडर्ड साइड प्रोटेक्शन एअरबॅग्सची कमतरता, ईएससी नसणे.
  • रिअर सेंटर सीटमध्ये तीन-पॉइंट यूनिटएवजी लॅप बेल्टचा वापर

‘लॅटिन एनसीएपी’च्या अहवालानुसार, वरील गोष्टींमुळे कारला ‘झिरो स्टार रेटिंग’ मिळाले. एवढेच नाही, तर सुझुकी या कारमध्ये ‘चाइल्ड रिस्ट्रंट सिस्टिम’ (सीआरएस)ची शिफारस करीत नसल्याचे म्हटले आहे.

टाटा मोटर्सने उडविली खिल्ली
मारुती स्विफ्टला ‘लॅटिन एन्केप क्रॅश टेस्ट’मध्ये शून्य रेटिंग मिळाल्याने टाटा मोटर्सने ही संधी साधत प्रतिस्पर्धी ‘मारुती सुझुकी’ला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले.

Advertisement

टाटा मोटर्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर फोटो पोस्ट केला. त्यावर “Don’t gamble with safety” अर्थात सुरक्षिततेसोबत जुगार खेळू नका, असे लिहिले होते. त्यात कंपनीने ‘स्विफ्ट’ नावाचे इंग्रजी शब्द (SIWTF) असे लिहिले होते. नंतर कंपनीने ही पोस्ट हटविली. मात्र, तोपर्यंत ती व्हायरलही झाली होती.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा अणि मिळवा संधी iPhone10 जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement