SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जॅकलिन फर्नांडिस हिचीच मनी लाँड्रिंग प्रकरणात शिकार, तपासात आणखी एका अभिनेत्रीचेही नाव समोर..!

श्रीलंकेची विश्वसुंदरी व बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिची सोमवारी (ता. 30) अंमलबजावणी संचालनालय, अर्थात ईडी (ED)च्या दिल्लीतील कार्यालयात तब्बल 5 तास चौकशी करण्यात आली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात ही चौकशी झाल्याचेही समोर आले होते.

मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनचाही समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. मनी लाॅंन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन आरोपी नसून, उलट या रॅकेटची ती शिकार झाल्याचे समोर आलेय. एक साक्षीदार म्हणून तिची चौकशी करण्यात आल्याचे समजते.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतील फिल्ममेकर सुकेश चंद्रशेखर याच्याविरुद्ध 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या तो दिल्लीतील रोहिणी तुरुंगात आहे. या धंद्यातील त्याची भागीदार लीना पॉल हिच्या माध्यमातून जॅकलिन या सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात आली.

साक्षीदार म्हणून चौकशी
नेत्यांचे नातेवाईक, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून या सुकेश चंद्रशेखरने अनेकांना गंडा घातला आहे. त्यात जॅकलिन हिचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे समजते. त्यामुळे सुकेश चंद्रशेखरविरुद्धच्या खटल्यात साक्षीदार म्हणून तिची चौकशी केली जात आहे.

Advertisement

आणखी एक अभिनेत्रीही लक्ष्य
ईडीच्या चौकशीदरम्यान जॅकलिन हिने महत्त्वाची माहिती दिल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, बॉलिवूडमधील आणखी एका टॉप अभिनेत्रीलाही सुकेशने लक्ष्य केल्याचे तपासात समोर आलेय. मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे या अभिनेत्रीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

आरोपी चंद्रशेखरच्या मालकीचा चेन्नईतील समुद्रालगतचा बंगला, 82.5 लाख रुपये कॅश आणि डझनभर लक्झरी कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सुकेश व साथीदारांविरुद्ध गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक व 200 कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदविला आहे.

Advertisement

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा अणि मिळवा संधी iPhone10 जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement