SpreadIt News | Digital Newspaper

व्हॉट्सअ‍ॅप आणखी भारी होणार, लवकरच येणार Instagram सारखं ‘हे’ खास फिचर..!

0

सोशल मीडिया म्हटलं की, आपण कधी कधी मेसेज टाईप करण्यापेक्षा इमोजी सेंड करत असतो. त्याने अनेक आभासी भावना व्यक्त होत असताना चॅटिंग करण्यासाठी नवीन वाटते. आता व्हॉट्सअ‍ॅप Emoji बाबत असंच एक नवीन फिचर आणणार आहे.

WhatsApp चं नवीन फिचर कोणतं?

Advertisement

WhatsApp आपल्या युजर्ससाठी जमेल तितक्या लवकर ट्विटर (Twitter), इन्स्टाग्राम (Instagram) आणि सिग्नल (Signal) या तरुणाईला वेड लावणाऱ्या लोकप्रिय अ‍ॅपमध्ये असणारे खास फीचर आणण्याच्या तयारीत आहे. त्यावर सध्या कामही चालू आहे.

WABetaInfo या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून याविषयी अधिक माहीती दिली आहे. यावरून कंपनी आता मेसेज रिअ‍ॅक्शन फीचरवर काम करत आहे. या फीचरद्वारे युजर्स चॅटमध्ये आलेल्या मेसेजवर रिअ‍ॅक्शन (प्रतिक्रिया) देऊ शकतील. यामुळे चॅटचा अनुभव आणखी आनंददायी बनेल. हे फीचर फेसबुक (Facebook) आणि त्याच्या मेसेंजर (Messenger) अ‍ॅपमध्ये याआधीच आहे.

Advertisement

व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरची सध्या टेस्टिंग चालू असून असून WhatsApp Users ना लवकरच या फिचरचा अनुभव घेण्यासाठी रोलआउट केलं जाणार आहे. WhatsApp च्या लेटेस्ट अपडेटवर नजर ठेवणाऱ्या WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp सुद्धा इतर अ‍ॅप्सप्रमाणे मेसेज रिअ‍ॅक्शन फीचर आणणार आहे.

या फिचरची इंटरनल टेस्टिंगही चालू असल्या कारणाने ते अजून तरी बीटा युजर्ससाठी उपलब्ध नाही. तर हे फीचर रोलआऊट झाल्यानंतरही केवळ WhatsApp चं लेटेस्ट वर्जन वापरणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध असेल. त्यामुळे तुम्ही तुमचं WhatsApp लगेच अथवा वेळीच Whatsapp Update ठेवणं गरजेचं आहे.

Advertisement

समजा, जर तुमच्याकडे WhatsAppचं जुनं व्हर्जन असेल, ते हे फीचर अपडेट होऊन येणार नाही. यासाठी whatsapp app अपडेट करावं लागणार आहे. WABetaInfo कडून सांगण्यात आलं आहे की, हे नवं फीचर फक्त अँड्रॉईड युजर्ससाठीच नाही, तर हे iPhone, वेब आणि डेस्कटॉप वर्जनवरही चालू शकेल, त्यामुळे WhatsApp Users याचा वापर या सगळ्याद्वारे करू शकतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement