SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्र हळहळला! विषबाधेने एकाच कुटुंबातील 11 जणांना विषबाधा; चिमुकल्यासोबत आई-वडीलांचाही मृत्यू

तीन दिवसांपूर्वी झालेल्या मेळघाटच्या चिखलदरा (chikhaldara amravati) तालुक्यातील डोमा येथे एकाच कुटुंबातील 11 जणांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली. यामध्ये सात वर्षांच्या मुलापाठोपाठ आईवडिलांचा मृत्यू झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. तरी घटनेचे अद्याप कारण समजू शकलेले नाही.

लक्ष्मी बुधराज बछले (30, रा. डोमा) असं मृत महिलेचं नाव आहे. तीन दिवसांपासून जीवन-मरणाच्या संघर्षात झुंज देणाऱ्या या महिलेने रविवारी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सात वर्षीय मुलगा आयुष, तर शनिवारी पती बुधराज (35) यांचा मृत्यू झाला.

Advertisement

ही धक्कादायक घटना 26 ऑगस्ट रोजी घडली. यापैकी आयुष बुधराज बछले (वय 7) याचा मृत्यू घरीच झाल्याची माहिती मिळाली. तर, इतर 10 जणांना काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने काटकुंभ येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चुरणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जाण्यास सांगितले.

या सर्व 10 व्यक्तींपैकी आयुषच्या आई व वडिलांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे चुरणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना अमरावतीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्यास सांगितले. ज्यामध्ये बुधराज बछले यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी (ता. 28) मृत्यू झाला. तर, आई लक्ष्मी बछले यांचा रविवारी (ता. 29) दुपारी 1 वाजताच्या सुमारास सुपर स्पेशालिटीमध्ये मृत्यू झाल्याची माहीती आहे.

Advertisement

दरम्यान, कुटुंबातील इतर 8 जणांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. परतवाडा व अमरावती येथील रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे त्यांनी स्वतःहून सुटी घेतली असल्याची माहीती डॉ. आदित्य पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा यांनी दिली.

ग्रामस्थांनी केली डॉक्टरला मारहाण:

Advertisement

काटकुंभ आरोग्य केंद्र अंतर्गत डोमा उपकेंद्र येथे कार्यरत एका डॉक्टरला संतप्त ग्रामस्थांनी याप्रकरणी कारण नसताना डॉक्टरला मारहाण केल्याचं समजतंय. काटकुंभ पोलीस चौकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी सांगितले. तरी या घटनेमुळे शोककळ पसरली आहे. आता ग्रामस्थांकडून सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.

मेळघाटमध्ये कुपोषणाची समस्या कायम

Advertisement

गेल्या अनेक दशकांपासून मेळघाटमध्ये कुपोषणाची समस्या कायम आहे. गेल्या 3 महिन्यात 49 बालमृत्यू झाले आहेत. यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकरला फटकारत बालमृत्यू झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार राहील अशी तंबी दिलीय. राज्य सरकारने दखल घेत 15 दिवसांकारिता बालरोग, स्त्रीरोग तज्ञांची नियुक्ती केली आहे. मेळघाट हा घनदाट जंगलाचा परिसर आहे. या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement