SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अशी वाहने भंगारात काढली जाणार..! सरकारकडून स्क्रॅपिंगचे नियम जाहीर, जाणून घ्या निकष.!

भारतात 20 वर्षांपर्यंत खासगी वाहनांचे, तर व्यावसायिक वाहनांना 15 वर्षांचे आयुष्य ठरले आहे. त्यानंतर वाहनांची तपासणी करून ती पर्यावरणपूरक आहेत की नाही, याची तपासणी केली जाते. जुन्या गाड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच ‘वाहन स्क्रॅप धोरण’ जाहीर केले होते.

भंगारात काढण्यात आलेल्या या जुन्या वाहनांचे स्क्रॅप करण्यासाठी देशभरात 450 ते 500 ठिकाणी ‘नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग फॅसिलिटी’ (Registered Vehicle Scrapping Facility) सुरु केल्या जाणार आहेत.

Advertisement

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. त्यात कोणती वाहने स्क्रॅप केली जातील, याबाबत नियम सांगितले आहेत.

Advertisement

कोणती वाहने स्क्रॅप होणार..?
– केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 52 नुसार, ज्या वाहनांचे रजिस्ट्रेशन रेन्यू होणार नाही, अशी वाहने ‘आरएसव्हीएफ’ (RSVF) वर स्क्रॅप केली जाऊ शकतात.

– मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम– 62 नुसार फिटनेस प्रमाणपत्र दिले गेलेले नाही, तसेच कोणत्याही एजन्सीने स्क्रॅपसाठी लिलावात खरेदी केलेली वाहने भंगार जातील. ‘आरएसव्हीएफ’द्वारे लिलावात स्क्रॅप करण्यासाठी वाहने खरेदी केली जाऊ शकतात.

Advertisement

– आग, दंगल, नैसर्गिक आपत्ती, अपघात वा इतर कोणत्याही आपत्तीत खराब झालेली वाहने त्यांच्या मालकांनीच स्क्रॅप घोषित केल्यास, ती ‘आरएसव्हीएफ’वर स्क्रॅप केली जातील.

– केंद्र वा राज्य सरकारने कालबाह्य ठरवलेली वाहने, जी वाहने सरप्लस (अतिरिक्त) वा दुरुस्त होऊ शकणार नाहीत, तसेच कायदेशीर एजन्सीने जप्त केलेली वा बेवारस पडलेली वाहने RSVF वर स्क्रॅप ठरविली जातील.

Advertisement

– खाणी, महामार्ग बांधकाम, शेती, वीज, कारखाने किंवा विमानतळ, इत्यादी प्रकल्पांसाठी वापरलेली वाहने किंवा त्यांचा कालावधी पूर्ण होऊन उपयोगात नसलेली वाहने मालकाच्या संमतीने भंगारात काढली जातील. शिवाय आपल्या इच्छेनुसार कोणीही स्क्रॅप करण्यासाठी वाहन पाठवू शकतो.

– वाहन तयार करताना (मॅन्यूफॅक्चरिंगदरम्यान) रिजेक्ट झाल्यास, अथवा कारखान्यातून डिलरकडे नेताना प्रवासादरम्यान खराब (अपघातग्रस्त वा मोडतोड) झालेली आणि विक्रीयोग्य नसलेली वाहने कंपनीच्या मान्यतेनंतर ‘आरएसव्हीएफ’वर स्क्रॅप केली जाणार आहेत.

Advertisement

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा अणि मिळवा संधी iPhone10 जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement