SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जॅकलिन फर्नांडिस आता ईडीच्या रडारवर, मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी पाच तास चौकशी, नेमकं काय प्रकरण आहे पाहा..

सक्तवसुली संचालनालय, अर्थात ईडीच्या (ED) कारवाईवरुन महाराष्ट्रात जोरदार राजकारण रंगलेले असताना, आता बाॅलिवूडही ईडीच्या रडारवर आल्याचे दिसत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काही दिवसांपूर्वीच ईडीकडून प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम हिची चौकशी करण्यात आली होती.

आता ईडीच्या निशाण्यावर श्रीलंकेची विश्वसुंदरी, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातच जॅकलीनची चौकशी सुरु आहे. नवी दिल्ली येथील ईडीच्या कार्यालयात गेल्या पाच तासांपासून ही अभिनेत्री ईडीच्या प्रश्नांचा सामना करतेय.

Advertisement

Advertisement

राजकीय वर्तुळासोबत आता बॉलिवूडमध्येही मनी लाँड्रिंग प्रकरणाचे धागेदोरे सापडत आहेत. परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांचे (फेमा) उल्लंघन केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने यामी गौतमचा जबाब नोंदविला होता. त्यानंतर आता जॅकलीनचीही चौकशी सुरू झाल्याने बाॅलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय..?
चेन्नईतील सुकेश चंद्रशेखर याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सध्या तो दिल्लीतील तिहार जेलमध्ये आहे. सुकेश चंद्रशेखर व तेथील अभिनेत्री लीन पॉल यांच्या बंगल्यावर ईडीने २३ ऑगस्ट रोजी छापा घातला होता. त्यात सुकेशच्या बंगल्यातून मोठी रक्कम व १५ गाड्या जप्त केल्या होत्या.

Advertisement

दरम्यान, या सुकेशने तिहार जेलमध्ये असतानाही एका मोठ्या उद्योगपतीच्या पत्नीकडून २०० कोटी रुपयांची खंडणी वसूल केली होती. या प्रकरणात सुकेश आणि लीना पॉल यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. आता या प्रकरणात जॅकलिनचेही नाव समोर आले असून, त्यामुळेच तिची चौकशी सुरु असल्याचे समजते.

दरम्यान, जॅकलीनच्या टीमकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जॅकलिनची चौकशी नेमक्या कोणत्या प्रकरणात केली जात आहे, हे ईडीकडूनही अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही.

Advertisement

‘भूत पोलिस’ सिनेमात दिसणार
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची जॅकलिन ही अतिशय जवळची मैत्रीण आहे. आगामी ‘भूत पोलिस’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात यामी गौतमीसोबत ती पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पूर्वीच रिलिज झाला असून, 17 सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा अणि मिळवा संधी iPhone10 जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement