राज्यात पुन्हा रात्रीची संचारबंदी लागणार, केंद्र सरकारच्या राज्य सरकारला सूचना, आरोग्यमंत्री टोपे यांनी काय म्हटलेय पाहा..?
देशभर कोरोनाबाधितांची संख्या घटली असली, तरी महाराष्ट्र व केरळमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्राने या दोन्ही राज्यांना रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केली होती. त्यानुसार लवकरच महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
केरळमध्ये ओणम सणानंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्रात ‘नाईट कर्फ्यू’बाबत केलेल्या सूचनेची अंमलबाजावणी केली जाणार आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच जाहीर करतील, असेही टोपे म्हणाले.
ओणम सणानंतर केरळमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढली. महाराष्ट्रात आगामी काळात दहीहंडी, गणेशोत्सवासारखे सण येत आहेत. त्यामुळे रस्त्यावर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. केरळमधील परिस्थिती पाहता, महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केंद्राने राज्याला केली आहे.
कोरोनाबाबत काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनेची अंमलबजावणी केली जाईल. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेणार असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, देशभरात गेल्या काही दिवसांपासून रोज 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र व केरळात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ‘नाईट कर्फ्यू’ लावण्याची सूचना केली आहे.
केरळमध्ये नाईट कर्फ्यू लागू
केरळात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शनिवारी (ता. २८) राज्यात नवा आदेश जारी केला. त्यानुसार, केरळात रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे आदेश सोमवारपासून (ता. ३०) लागू करण्यात येणार आहे.
केरळमध्ये टेस्टिंग वाढविण्यात येत आहेत. शनिवारी केरळात 1,67,497 लोकांचे सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले. पैकी 31,265 कोरोनाबाधित आढळून आले. सोबतच 153 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री विजयन यांनी दिली.