SpreadIt News | Digital Newspaper

दहावी पास तरुणांना देशसेवेची संधी..! जीडी काॅन्स्टेबल पदासाठी 25 हजार जागांवर भरती प्रक्रिया सुरु..!

0

देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत तब्बल 25271 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेत पुरुष उमेदवारांसाठी 22424 जागा, तर महिलासांठी 2847 जागांवर ही भरती होणार आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) ने CAPF मधील कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी किंवा जीडी), SSF आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमन या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. मात्र, आता त्यासाठी अखेरचे तीनच दिवस शिल्लक आहेत.

Advertisement

विभागनिहाय पदसंख्या

  • बीएसएफ : 7545
  • सीआयएसएफ : 8464
  • एसएसबी : 3806
  • आयटीबीपी : 1431
  • आसाम रायफल्स : 3785
  • एसएसएफ : 240
    (यावेळी सीआरपीएफ आणि एनआयएमध्ये कोणत्याही जागा निघालेल्या नाहीत.)

महत्वपूर्ण तारखा

Advertisement
  • अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु  – 17 जुलै
  • ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख – 31 ऑगस्ट (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
  • ऑनलाईन फी जमा करण्याची अखेरची तारीख – 2 सप्टेंबर (रात्री 11.30 वाजेपर्यंत)
  • ऑफलाईन चलन जनरेट करण्याची अखेरची तारीख- 4 सप्टेंबर (रात्री 11.30 वाजता)
  • चलनाद्वारे फी जमा करण्याची अखेरची तारीख – 7 सप्टेंबर
  • टियर – 1 परीक्षा (सीबीटी) चे तारीख नंतर कळवली जाणार आहे.

पात्रता
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ‘सीएपीएफ जीडी कॉन्स्टेबल’ पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे.

Advertisement

शारीरिक पात्रता

उंची
पुरुष उमेदवार – 170 सेमी.
महिला उमेदवार – 157 सेमी.

Advertisement

छाती
पुरुष उमेदवार – 80 सेमी. (फुगवून – 85 सेमी)

पगार
उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना पे लेवल -3 च्या प्रमाणे 21700-69100 रुपये पगार मिळेल.

Advertisement

अर्ज कुठे करणार ?
स्टाफ सिलेक्शन कमिशनची ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकता.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा अणि मिळवा संधी iPhone10 जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement