SpreadIt News | Digital Newspaper

कोरोनाचे निर्बंध 30 सप्टेंबरपर्यंत वाढविले..! देशातील 6 राज्यांची स्थिती चिंताजनक, आदेशात काय म्हटलेय पाहा..?

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. त्यातही केरळ आणि महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या रूपाने आलेले संकट चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने देशात सध्या लागू असलेले कोरोनाचे निर्बंध 30 सप्टेंबरपर्यंत कायम राहतील, असा आदेश दिला आहे.

सणासुदीच्या दिवसांत गर्दी करु नये, तसेच सभा, मेळावे घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. कोरोनाचे निर्बंध 31 ऑगस्ट रोजी समाप्त होणार होते. त्यानंतर निर्बंधामध्ये काही प्रमाणात सूट देण्यात येईल, असे वाटत होते. मात्र, केंद्र सरकारने कोणताही धोका न स्वीकारता महिनाभरासाठी हे निर्बंध वाढविले आहेत.

Advertisement

कोरोना संसर्ग वाढणाऱ्या राज्यांनी स्थानिक पातळीवर कठोर निर्णय घेत निर्बंध लागू करावेत, अशी सूचनाही केंद्र सरकारने राज्यांना केली आहे. त्यात महाराष्ट्र वरच्या क्रमांकावर आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

ओणम सणानंतर केरळमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गणेशोत्सवासारखा मोठा सण सप्टेंबरमध्ये येतो आहे. केरळसारखीच परिस्थिती महाराष्ट्रावर ओढवू नये, यासाठी गणेशोत्सवात एकत्र जमण्यावर कडक निर्बंध घालण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट नि मृत्यूदर वाढत असल्याने टेन्शन वाढले आहे. त्यामुळे तिसरी लाट आणखी भयंकर असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच सध्याचेच कोरोना निर्बंध पुढील महिनाभर कायम राहतील, असे आदेशात म्हटले आहे.

Advertisement

महाराष्ट्रानंतर केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडीसा या राज्यांत बहुतांश रुग्ण आढळून येत आहेत. देशातील 41 जिल्ह्यांचा पाॅझिटिव्हिटी रेट 10 टक्के आहे, तर दैनंदिन रुग्णसंख्या 35 ते 45 हजाराच्या दरम्यान आहे. महाराष्ट्रात रोज 3500 ते 4000 नवे रुग्ण समोर येत आहेत.

राज्यात लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण 10 टक्के आहे. सध्या राज्यात कोरोनाचे एकूण 51 हजार 500 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे दिवाळीपर्यंत हे निर्बंध कायम राहू शकतात. रोज 1 कोटी लसीकरण झाले, तरी डेल्टा प्लसचा धोका कायम असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्णसंख्येचे जिल्हे

  • पुणे – 13715
  • ठाणे – 7082
  • अहमदनगर – 5295
  • सातारा – 5254
  • सांगली – 4876

केंद्राने दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारला कोरोनाबाबत सावध करणारे पत्र पाठविलेय. महाराष्ट्र नि केरळमधील कोरोना रुग्णसंख्येबाबत केंद्राने चिंता व्यक्त केलीय. संसर्ग रोखण्यासाठी कन्टेन्मेंट स्ट्रेटजी, टेस्टिंग, जीनोमिक सर्विलान्स, व्हॅक्सीनेशन, जिल्हा स्तरावर कसं काम केलं जावं, याबाबत माहिती दिलीय.

Advertisement

महाराष्ट्रात दहीहंडी, गणेशोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेऊन सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालावी, तसेच टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, वॅक्सीनेशन आणि कोविड अप्रोप्रियट बिहेव्हियरवर जोर देण्याचे आवाहन केंद्र सरकारने राज्य सरकारला केले आहे.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा अणि मिळवा संधी iPhone10 जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement