SpreadIt News | Digital Newspaper

अनिल देशमुख यांना ‘क्लिन चिट’..? 100 कोटी वसुली प्रकरणाला वेगळे वळण, व्हायरल अहवालात काय म्हटलेय पाहा..?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपांतून ‘सीबीआय’च्या प्राथमिक तपासात ‘क्लिन चिट’ मिळाल्याची माहिती समोर येतेय. ‘सीबीआय’चे उपअधीक्षक आर. एस. गुंजाळ यांनी हा 65 पानी अहवाल सादर केलाय. त्यामुळे देशमुख यांच्यासाठी हा मोठा दिलासा असणार आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितल्याचा सनसनाटी आरोप केला होता. त्यानंतर हे प्रकरण देशभर मोठ्या प्रमाणात गाजले. देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला.

Advertisement

दरम्यान, आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. देशमुख यांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात आली. ‘सीबीआय’च्या प्राथमिक चौकशीत देशमुख यांना ‘क्लिन चिट’ दिल्याचा दावा करणारी कागदपत्रे गेल्या दोन दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये फिरत आहेत.

Advertisement

‘सीबीआय’च्या नावे असणाऱ्या या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह असले, तरी त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत ‘सीबीआय’कडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

अहवालात काय म्हटलंय?
‘सीबीआय’चे उपअधीक्षक आर. एस. गुंजाळ यांनी चौकशी अहवालात म्हटलेय, की देशमुख यांची आतापर्यंत प्राथमिक चौकशी झाली असून, त्यांच्याविरोधात एकही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत. त्यामुळे ही चौकशी थांबवून पुढील कारवाईही थांबवावी.

Advertisement

आरोपांत तथ्य नाही
गुंजाळ यांनी १५ दिवसांच्या चौकशीनंतर देशमुखांवरील आरोपांत काहीच तथ्य नसल्याने चौकशी बंद करण्याची शिफारस केली होती, परंतु ही बाब कोर्टासमोर मांडलीच गेली नाही. तपास अधिकाऱ्याची शिफारस डावलून ‘एफआयआर’ नोंदविल्याचा दावा या कागदपत्रांत केला आहे.

देशमुख यांच्या निवासस्थानी वाझे आणि देशमुख यांच्यात कोणतीही बैठक झाल्याचा पुरावा नाही. मुख्यमंत्र्यांकडील बैठकांना वाझे हे मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांच्यासोबतच जात असत.

Advertisement

संजय पाटील व राजू भुजबळ या अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांनी निधी जमवण्यासाठी पालंडे यांच्याकडून सांगण्यात आल्याचाही पुरावा नाही. देशमुख यांनी कोणताही दखलपात्र गुन्हा केल्याचे दिसत नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

‘सीबीआय’च्या या अहवालामुळे राजकीय क्षेत्रात चर्चा रंगल्या आहेत. देशमुख यांच्याभोवती आरोपांचे गूढ वलय उभे केले, तरी त्यांना अटक करण्यासाठी केंद्रीय यंत्रणा धजावत नव्हत्या. त्यामागे देशमुख यांच्याविरुद्ध ठोस पुरावे नसणे, हेच कारण असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Advertisement

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा अणि मिळवा संधी iPhone10 जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement