बाॅलिवूड स्टारच्या बाॅडीगार्डचा पगार पाहून डोळे पांढरे होतील, इंजिनिअर्स, डाॅक्टरपेक्षाही अंगरक्षकांची मोठी कमाई..!
बॉलिवूड स्टार्सच्या सावलीप्रमाणे सोबत असतात, ते त्यांचे बाॅडीगार्डस्.. अर्थात अंगरक्षक. या स्टारच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच असते. लोकांमध्ये वावरताना बऱ्याचदा या सुपरस्टार चाहत्यांच्या वेडेपणाचा सामना करावा लागतो. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी हे अंगरक्षक स्वतःचे कडे करतात.
आपले संरक्षण करणाऱ्या या बाॅडीगार्डना काही सुपरस्टार कुटुंबातील सदस्य मानतात. घासातील घास देतात. या बॉडीगार्डचे वेतन पाहून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होतील. नुकतेच मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या बाॅडीगार्डचे वेतन समोर आले नि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
बाॅलिवूड स्टारचे रक्षण करणारी ही मंडळी लाखोत नाही, तर चक्क कोटींत कमावत असल्याचे यानिमित्ताने समोर आले. बॉलिवूडमधील टाॅप पाच स्टार्सच्या बॉडीगार्डबद्दल व त्यांच्या वेतनाबद्दल जाणून घेऊ या..!
सलमान खान – शेरा
सलमान खानचा बाॅडीगार्ड ‘शेरा’ हे नाव आता अनेकांच्या चिरपरिचयाचे झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेरा सलमानसोबत आहे. सलमानही त्याला घरातील सदस्यासारखेच मानतो. शेराचे खरे नाव गुरमीत सिंग जॉली आहे. शीख कुटुंबातील शेराला लहानपणापासूनच बॉडी बिल्डिंगची आवड होती.
सलमान खानला सुरक्षा देण्यासाठी शेराला वर्षाला सुमारे 2 कोटी रुपये वेतन मिळते, म्हणजेच त्याला सुमारे 16 लाख रुपये दर महिन्याला मिळतात.
अमिताभ बच्चन – जितेंद्र शिंदे
अमिताभ बच्चन यांचा अंगरक्षक असणाऱ्या जितेंद्र शिंदे याची नुकतीच बदली करण्यात आली. अनेक वर्षापासून तो अमिताभ बच्चन यांच्यासोबत होते. बिग बी त्याला वार्षिक 1.2 कोटी पगार देत असल्याचे समोर आले होते. याबाबत चौकशीही सुरु असल्याचे समजते. कोणत्याही कार्यक्रमाच्या वा शूटिंगदरम्यान तो नेहमी बिग बींसोबत दिसत होता.
आमिर खान – युवराज घोरपडे
आमिर खानच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्या अंगरक्षक युवराज घोरपडे याच्यावर आहे. चित्रपटाचे प्रमोशन असो वा शूटिंग, युवराज आमिर सोबत सावलीप्रमाणे संरक्षणासाठी फिरतो. आमिर खान त्याला दरवर्षी 80 लाख पगार देतो.
शाहरुख खान – रवी सिंह
शाहरुख खानच्या अंगरक्षकाचे नाव आहे, रवी सिंह. शाहरुख त्याला दरवर्षी 2.5 कोटी वेतन देतो. रवी सिंहच्या आधी यासीनने सलग 10 वर्षे किंग खानचे संरक्षण केले होते. आता त्याने स्वतःची सुरक्षा कंपनी उघडली आहे.
अक्षय कुमार – श्रेयस ठेले
बाॅलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमार याच्या अंगरक्षकाचे नाव आहे, श्रेयस ठेले. अक्षयसोबत त्याच्या मुलाची आरवच्या सुरक्षेची जबाबदारीही श्रेयसवरच आहे. अक्की आपल्या या अंगरक्षकाला वार्षिक 1.2 कोटी रुपये देत असल्याचे समजते.
अनुष्का शर्मा – सोनू
विराट कोहलीसोबत लग्नाच्या आधीपासून अनुष्का शर्मा हिचे रक्षण बाॅडीगार्ड सोनू करीत आहे. त्याचे पूर्ण नाव प्रकाश सिंह आहे. आता सोनू विराट आणि अनुष्का दोघांचेही संरक्षण करतो. काही मीडिया रिपोर्टसनुसार, अनुष्का शर्मा तिचा बॉडीगार्ड सोनूला वार्षिक 1.2 कोटी रुपये देते.