SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

📣 महत्वाच्या बातम्या वाचा 2 मिनिटांत

👮🏻 ब्रेकिंग: आता नितेश राणे आणि निलेश राणेंवरही ‘या’ कारणामुळे गुन्हे दाखल!

कालच्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत जमावबंदी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे व निलेश राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह 30 ते 40 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर भाजप चे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह 50 ते 60 व्यक्तींवरदेखील गुन्हे दाखल झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा 135, 188, 143 अन्वये हे गुन्हे दाखल झाले आहेत.

Advertisement

🏍️ वाहनांच्या क्रमांकात होणार मोठा बदल!

वाहनांच्या सुरळीत वाहतुकीसाठी रस्ते वाहतूक आणि हायवे मंत्रालयाने भारतात नवीन नोंदणी चिन्ह जाहीर केले आहे. आता यापुढे वाहनांना भारत सिरिज (BH-series) म्हणजे वाहनांच्या क्रमांकाआधी BH असे लिहिलेले असणार आहे. याआधी वाहनांच्या क्रमांकाच्या आधी राज्याचे चिन्ह लिहिलेले असायचे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील गाडी असल्यास त्यावर MH असं लिहिलेलं असायचं. पण, आता BH असे लिहिले जाणार आहे.

Advertisement

📋 MPSC परीक्षांचे ट्विटरवर लेटेस्ट अपडेट्स

स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महत्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थांना परीक्षांची माहिती आणि इतर महत्वाच्या अपडेट्स साठी एमपीएससीने मोठं पाऊल उचलले आहे. शुक्रवारी MPSC ने आपलं अधिकृत ट्विटर हँडल सुरु केलं आहे. याद्वारे विद्यार्थांना स्पर्धा परीक्षासंदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे.

Advertisement

©️ कॉपीराईट: ‘बाल शिव’ मालिका वादाच्या भोवऱ्यात

झी’ वाहिनीवर पुढील आठवड्यापासून प्रसारित होणाऱ्या ‘बालशिव- महादेव की अनदेखी गाथा’ या मालिकेविरोधात स्वामित्व हक्क कायद्याचे (कॉपीराईट) उल्लंघन केल्याचा दावा करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची दखल घेत हायकोर्टानं या मालिकेचे पहिले 10 भाग (एपिसोड) याचिकाकर्त्यांना दाखविण्याचे निर्देश ‘झी’ एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसला दिले आहेत.

Advertisement

😳 एकाच रात्रीत 8 दुकानात दरोडे

बार्शीच्या मुख्य बाजारपेठेत एकाच रात्रीत जवळपास 8 दुकानात दरोडा, रात्री 3 च्या सुमारास शटर उचकटून चोऱ्या, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद, हजारोंचा माल लंपास, पोलिसांकडून शोध सुरू

Advertisement

🤷‍♂️ राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेत चोरांची मजा

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेत चोरट्यांच्या टोळक्याने खारेपाटण येथील राणेंच्या स्वागतादरम्यान भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या खिशातील पाकीट लांबवले. काळसेकर यांच्या पाकिटात 40 ते 45 हजार रुपयांची रोकड होती. रत्नागिरीतही गर्दीचा फायदा घेत चोरांनी हातसफाई करत रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने लांबवण्याचा प्रकार घडला.

Advertisement

🥷🏻 भारतावर ISIS-K चा वाढला धोका?

अफगाणिस्तानात झालेल्या स्फोटानंतर माध्यमांच्या माहितीनुसार, भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या असून भारतावर ISIS-K चा धोका वाढला आहे. ही संघटना दक्षिण आशिया आणि नंतर भारतात पोहोचण्याचा प्रयत्न करू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. इसिस खोरासनला कट्टरपंथी इस्लामी राजवट लादण्याची इच्छा आहे.

Advertisement

😷 देशातील आजची कोरोना स्थिती (28 ऑगस्ट रोजी स. वाजता)

▪️एकूण सक्रिय रुग्ण : 3,55,109
▪️एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 3,18,45,589
▪️ कोरोनामुळे आतापर्यंत एकूण मृत्यू : 4,37,473
▪️ देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 62,29,89,134

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement