SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग: करून दाखवलं! ‘त्या’ बॉम्बस्फोटाचा अमेरिकेने घेतला बदला; अफगाणिस्तानातील इसिसवर केला ड्रोन हल्ला!

बुधवारी काबूल विमानतळावर बॉम्बस्फोट झाले (Kabul Airport Blast) होते. काबूलमधील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघाती स्फोटांतील मृतांची संख्या 170 झाली आहे. एक हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अमेरिकेच्या 13 सैनिकांचा समावेश आहे.

काबुल विमानतळाच्या ॲबे प्रवेशद्वाराजवळ गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा अमेरिकी सैनिक प्रयत्न करत असतानाच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खुरासान प्रोविंसनं घेतली होती.

Advertisement

यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले होते की, ‘अमेरिका आपल्या शत्रूंना शोधून मारेल.’ अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी गुरुवारी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटांसाठी इस्लामिक स्टेटला जबाबदार धरले. काबूल विमानतळावरील हल्ल्याचा अमेरिकन लष्कराने अवघ्या 48 तासांच्या आत बदला घेतला आहे.

काबूल विमानतळावर झालेल्या हल्ल्यात 13 अमेरिकन सैनिक ठार झाले होते. यानंतर आता अमेरिकेनं या हल्ल्याचं सडेतोड उत्तर देत पूर्व अफगाणिस्तानात ड्रोन हल्ला (US carried out drone strike against Islamic State) केला आहे. पेंटागॉननं याबद्दलची माहिती दिली आहे.

Advertisement

यूएस सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी सांगितले की, अमेरिकी सैन्यांनी ISIS-K प्लॅनरच्या विरोधात दहशतवादविरोधी अभियान चालवले जात आहे. इस्लामिक स्टेट खुरासनने (ISIS-K) काबूल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. मात्र, अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्याने त्यांचे किती नुकसान झाले याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या अमेरिकेने लोकांना काबूल विमानतळाचे गेट लवकरात लवकर सोडण्यास सांगितले आहे.

प्राप्त माहीतीनुसार, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात काबूल विमानतळावर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असलेल्या एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, पूर्व अफगाणिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यात इसिस-के चा एक दहशतवादी ठार झाला आहे. तर केवळ एकच ड्रोन हल्ला झाल्याचं ते सांगतात. माध्यमांच्या माहीतीनुसार अमेरिकन लष्करानं हा हल्ला नानगहर प्रांतात केला आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

 

Advertisement