SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्तायादी जाहीर, असे पाहा यादीत आपले नाव, प्रवेशाची अंतिम मुदत जाणून घेण्यासाठी वाचा..!

अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी (ता. २७) जाहीर झाली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची आकडेवारी (कट ऑफ) जाहीर केली. त्यानुसार, विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलाॅट करण्यात आली आहेत.

शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे घेण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या फेरीतील पात्र विद्यार्थी व महाविद्यालये अलॉट केलेली संख्या शिक्षणमंत्री गायकवाड यांनी जाहीर केली.

Advertisement

मुंबई विभाग
मुंबई महानगर विकास प्राधिकरणात येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये 11 वी प्रवेशाची क्षमता 1 लाख 97 हजार 171 इतकी आहे. त्यासाठी 1 लाख 91 हजार 93 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी 1 लाख 17 हजार 883 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालये अलॉट केली आहेत.

Advertisement

पुणे
पुण्याची 11 वी प्रवेशाची क्षमता 86 हजार 482 आहे. त्यासाठी 56 हजार 767 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पैकी 38 हजार 858 विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट केली आहेत.

नाशिक
नाशिक जिल्ह्याची 11 वी प्रवेश क्षमता 20921 असून, 16,208 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. पैकी 11,850 विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट केली आहेत.

Advertisement

अमरावती विभाग
अमरावती विभागाची 11 वीची प्रवेश क्षमता 11,339 इतकी असून, पैकी 7408 विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले होते. पहिल्या यादीत 5533 विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट करण्यात आले आहेत.

नागपूर
नागपूर विभागाची 11 वी प्रवेशाची क्षमता 42,883 असून, त्यासाठी 17944 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. पैकी 14,245 विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट करण्यात आली आहेत.

Advertisement

महाविद्यालय अलॉट झालं का कसं तपासायचं?
स्टेप 1 : अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम https://11thadmission.org.in या वेबसाईटवर जावे.
स्टेप 2 : नोंदणी करताना मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड टाकून लॉगीन करा

स्टेप 3 : लॉगीन केल्यानंतर तुमच्या प्रवेशाचा तपशील पाहायला मिळेल.
स्टेप 4 : वेबसाईटवर ‘चेक अलॉटमेंट स्टेटस’ यावर क्लिक करावे.
स्टेप 5 : तुम्हाला महाविद्यालय अलॉट झाले असेल, तर त्याचे नाव स्क्रिनवर दिसेल

Advertisement

मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीने करण्यात येते. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे 11 वी प्रवेशाची पहिली यादी जाहीर केली आहे.

30 ऑगस्टपर्यंत प्रवेश घ्या..!
पहिल्या गुणवत्ता यादीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पात्र विद्यार्थ्यांनी 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन केले आहे. दरम्यान, यानंतर आणखी तीन फेऱ्या होणार असून, प्रवेशापासून कोणीही वंचित राहणार नसल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.

Advertisement

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा अणि मिळवा संधी iPhone10 जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement