SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुम्हाला माहीती आहे का? तुमच्या आधार क्रमांकावर कोणी-कोणी सिम घेतलंय, जाणून घ्या..

सिम कार्ड (Sim Card) घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आहे. अनेकदा काही जण आधार कार्डचा गैरवापर करत दुसऱ्याच्या नावावर सिम कार्ड घेतात. त्या सिम कार्डचा गैरवापर केला जातो. त्याचा परिणाम आधार कार्डधारकाला भोगावा लागतो.

दूरसंचार विभागाने (DOT) या समस्येतून सुटका करण्यासाठी टेलीकॉम अनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंझ्यूमर प्रोटेक्शन (TAFCOP) नावाचे पोर्टल सुरू केले आहे. TAFCOP च्या मते, या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्या आधार कार्डवर आतापर्यंत किती सिम रजिस्टर/घेतले आहेत (know how many mobile numbers are registered on your Aadhaar number) हे सहजपणे शोधू शकता.

Advertisement

या पोर्टलद्वारे वापरकर्ते त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेले सर्व फोन नंबर तपासू शकतात. जर तुमच्या माहितीशिवाय कोणताही मोबाईल नंबर तुमच्या आधार क्रमांकाशी जोडला गेला असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार देखील करू शकता. याशिवाय तुम्ही तुमचा जुना आणि न वापरलेला नंबरही सहजपणे तुमच्या आधारवरून वेगळा करू शकता.

तुमच्या आधार नंबरशी किती मोबाईल नंबर लिंक आहेत, जाणून घेण्यासाठी काय करायचं?

Advertisement

▪️ तुमचं आधार लिंक केलेल्या मोबाईल सिमबद्दल जाणून घेण्यासाठी, तुम्हाला http://tafcop.dgtelecom.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल.

▪️ वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक 6 अंकी ओटीपी (OTP) येतो.

Advertisement

▪️ तो ओटीपी टाकला की, नवीन इंटरफेस उघडेल. मग तुमच्या आधार क्रमांकावर खरेदी करण्यात आलेले मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईल स्क्रीनवर म्हणजेच वेबसाईटवर दिसेल.

▪️ एखाद्या व्यक्तीच्या नावावर 9 पेक्षा अधिक मोबाईल सिम कार्ड असतील, तर त्या व्यक्तीला एसएमएसद्वारे माहिती दिली जाते, असंही दूरसंचार विभागाने आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे.

Advertisement

▪️ तुमच्या नकळत जर अधिक मोबाईल सिम घेतले गेले असतील, तर त्याबाबतची तक्रारही या वेबसाईटद्वारे करता येते किंवा तुम्ही जे नंबर ब्लॉक करायचे आहेत, ते सिलेक्ट करून तुम्ही ब्लॉकही करू शकता.

▪️ तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठीच सध्या ही सुविधा असल्याचं, या वेबसाईटवर म्हटलं आहे. मात्र या सुविधेचा लाभ लवकरच इतर राज्यांतील लोक घेऊ शकणार आहे.

Advertisement

आधार कार्डाचा गैरवापर करुन सिम कार्ड घेतले जातात आणि त्याद्वारे काही वाईट प्रवृत्तीचे लोक फसवणूक करतात, लोकांना धमक्या देऊन अनोखी शक्कल लढवून पैसे लुबाडतात, तसेच ऑनलाईन फसवणूक केली जाते. ही वेबसाईट युझर्सच्या मदतीसाठी विकसित करण्यात आली आहे. या पोर्टलच्या मदतीने युझर्स त्याच्या नावे किती मोबाईल कनेक्शन सुरु आहेत, हे आता जाणून घेऊ शकता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement