SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दिलासादायक! राज्यात पावसाची तुफान बॅटिंग होणार, वाचा तुमच्याकडे कधी आणि कुठे होतेय एंट्री..

शेतकऱ्यांना पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दहा-बारा दिवस दडी मारल्यानंतर मागील आठवड्यात 16 ते 18 ऑगस्टदरम्यान पावसाने जाेरदार धडक दिली. त्यानंतर मात्र पुन्हा ताे गायब झाला. पावसाच्या गायब हाेण्याने चिंताग्रस्त झालेल्यांसाठी काहीसा दिलासादायक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आता हवामान विभागानं राज्यात पाऊस चांगला कमबॅक करेल असे सांगितले आहे

गुरुवारी चंद्रपुरात एका ठिकाणी पाऊस पडला; पण इतर सर्व जिल्हे काेरडेच राहिले. पाऊस गायब झाल्यावर तापमानात परत वाढ होऊ लागल्याने नागपूरचे तापमान 33.8 अंश नाेंदविण्यात आले होते, तर चंद्रपूरचे सर्वाधिक 34 अंश तापमान नोंदले गेले होते.

Advertisement

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार..

देशातील केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर आणि महाराष्ट्रावरही ढग जमा झाले आहेत. त्यामुळे पुढील 48 तासात राज्यात पावसाला सुरुवात होईल, अशी माहिती हवामान तज्ञ् के. एस . होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी दिली आहे.

Advertisement

प्रादेशिक हवामान विभागाने (Meteorological Department) पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही भाग आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस (Rain) होण्याची शक्यता आहे. येत्या 3-4 दिवसांत पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह चांगला पाऊस हाेण्याची शक्यता आहे.

गुरुवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. मुंबई, अलिबाग, पुणे, नाशिक, सांगली, महाबळेश्वर भागांत हलका पाऊस झाला. पुढील तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात मोठ्या पावसाची शक्यता नाही. उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Advertisement

हवामान विभागाने राज्यात 29 आणि 30 ऑगस्टला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊ शकतो. असा अंदाजही ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करून केला आहे.

यलो अलर्ट कुठे-कुठे?

Advertisement

यलो अलर्ट: यलो अलर्ट म्हणजे हवामान विभागाने दिलेल्या महितीबाबत अद्ययावत राहा, माहिती घेत राहा. यलो अलर्ट असलेल्या भागात धोका रेड-ऑरेंज अलर्टच्या तुलनेत कमी असतो, पण तरीही सतर्क राहणं गरजेचं असतं. हवामान विभाग देत असलेल्या अपडेट्सवर लक्ष ठेवणं अपेक्षित असतं. ज्यामुळे नुकसान टळेल.

महाराष्ट्रात सध्या प्रामुख्याने पूर्व विदर्भास यलो अ‌ॅलर्ट जाहीर (Yellow Alert Issued) करण्यात आला आहे. 28 ऑगस्टला वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement