SpreadIt News | Digital Newspaper

बिग बाॅस मराठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..! मराठीतील कोणते तारे-तारका होणार सहभागी, सूत्रसंचालन कोण करणार, वाचा..

0

हिंदीतील ‘बिग बाॅस’ पावलावर पाऊल टाकत मराठीतही हा कार्यक्रम सुरु झाला. अर्थात भाषा बदलली, तरी ढाचा तोच आहे. तेच वाद, तिच भांडणे नि एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढणे. यंदाच्या बिग बाॅस मराठीच्या (Big Boss) तिसऱ्या पर्वाला लवकरच सुरवात होत आहे.

‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘बिग बॉस’चे तिसरे पर्व सादर केले जाणार आहे. त्याचा शानदार प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला. त्यानुसार येत्या 19 सप्टेंबरपासून ‘बिग बॉस मराठी 3’ला प्रारंभ होणार आहे.

Advertisement

दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर नुकतेच कॅन्सरचे ऑपरेशन झालेय. त्यामुळे यंदा हा शो कोण हाेस्ट करणार, असा सवाल प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र, आता मांजरेकर यांची प्रकृती उत्तम असून, यंदाच्या शोचे सूत्रसंचालनही तेच करणार असल्याचे प्रोमोतून दिसून आले आहे.

 

Advertisement
View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial)

Advertisement

15 सेलिब्रिटी 100 दिवस एकत्र
‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर 19 सप्टेंबरला संध्याकाळी सात वाजता रंगणार आहे. त्यानंतर रोज रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांना हा शो पाहता येईल. यंदा ‘बिग बॉस’च्या घरात कोण कोण मराठी तारे-तारका दिसणार, याबाबत आतापासून सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या आहेत.

Advertisement

वेगवेगळ्या क्षेत्रातील 15 सेलिब्रिटी 100 दिवस ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र बंदिस्त होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘अनलॉक एंटरटेन्मेंट’ अशी बिग बॉसच्या नव्या सिझनची थीम आहे.

‘बिग बाॅस’च्या घरात कोण कोण येणार..?
यंदाच्या सिजनमध्ये बिग बाॅसच्या घरात कोण कोण येणार, याबाबत चर्चा रंगल्या आहेत. त्यात ‘देवमाणूस’ मालिकेतील एसीपी दिव्या सिंहच्या भूमिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेली अभिनेत्री नेहा खान, ‘अग्गंबाई सासूबाई’मुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची नावंही चर्चेत आहेत.

Advertisement

शिवाय अक्षया देवधर, संग्राम समेळ, पल्लवी सुभाष, रसिका सुनील, केतकी चितळे, चिन्मय उदगीरकर, ऋषी सक्सेना, नेहा जोशी, अंशुमन विचारे, किशोरी आंबिये यांसारख्या कलाकारांनाही या शोसाठी विचारणा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा अणि मिळवा संधी iPhone10 जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement