SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारताची इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत डोकेदुखी वाढणार?; ‘हा’ IPL गाजवणारा अष्टपैलू खेळाडू मैदानाबाहेर!

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव केवळ 78 धावांत आटोपला (Indian team got bowled out for 78) आहे. एकामागोमाग एक फलंदाजाना तंबूत परतावे लागले. लॉर्ड्सनंतर लीड्सवर विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला ऑल आऊट करत पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगलाच मारा केला आहे.

पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला. रोहित शर्मा (19), लोकेश राहुल (0), चेतेश्वर पुजारा (1), विराट कोहली (7), अजिंक्य रहाणे (18), रिषभ पंत (2), रवींद्र जडेजा (4), मोहम्मद शमी (0), जसप्रीत बुमराह (0) व मोहम्मद सिराज (3) असे भारतीय फलंदाज एकामागून एक माघारी परतले. यात इंग्लंडच्या जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हर्टन यांनी प्रत्येकी 3, ऑली रॉबिन्सन व सॅम करन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Advertisement

भारताचा पाचवा गोलंदाज दुखापतग्रस्त..

भारताचा पहिला डाव संपल्यानंतर इंग्लंडचे हसीब हमीद व रोरी बर्न या सलामीवीरांनी शतकी भागीदारी रचली. टीम इंडियासमोरील अडचणी या वाढतच चालल्या होत्या. त्यात आयपीएल, वन-डे आणि कसोटीत नेहमीच जबरदस्त क्षेत्ररक्षण करणारा अष्टपैलू तसेच भारताचा पाचवा गोलंदाज रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा काल दुखापतग्रस्त झाला आहे.

Advertisement

मैदानावर असतानाच दुखापत झाल्याने टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने मैदान सोडले आहे. क्षेत्ररक्षण करता करता त्याला ही दुखापत झाल्याचं समजतंय. रवींद्र जडेजाची ही दुखापत किती जास्त आहे का किंवा गंभीर स्वरूपाची तर नाही ना, हे सगळं आता सामन्यानंतर स्पष्ट होईल. पण असं म्हटलं जात आहे की, हा खेळाडू नसल्याने भारताला प्रामुख्याने गोलंदाजीत व क्षेत्ररक्षणात त्याची कमी सध्या नक्कीच जाणवणार आहे.

इंग्लंडच्या बिनबाद 120 धावा:

Advertisement

इंग्लंडने भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत (IND vs ENG 3rd Test) सलामीला हसीब हमीद आणि रोरी बर्न्स ही नवी जोडी मैदानात पाठवली अन् त्या दोघांनी संयमी खेळ करताना इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी भागीदारी करताना एक वेगळा विक्रमही नोंदवला.

भारताच्या पहिल्या डावातील धावांचा पल्ला प्रतिस्पर्धी सलामीवीरांनी पार करण्याची ही 2011/12नंतरची पहिलीच वेळ ठरली आहे. पर्थ कसोटीत डेव्हिड वॉर्नर आणि एक कोव्हन यांनी टीम इंडियाच्या 161 धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या विकेटसाठी 214 धावांची भागीदारी केली होती. हमीद पाठोपाठ बर्न्सनेही अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडनं पहिल्या दिवसअखेर बिनबाद 120 धावा करत 42 धावांची आघाडी घेतली आहे. हसीब हमीदने 130 बॉलमध्ये 60 धावा तर रोरी बर्न्स 125 बॉलमध्ये 52 धावा करून नाबाद आहेत.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement