SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धक्कादायक! कौन बनेगा करोडपती’मधील पहिल्याच करोडपती विजेत्यावर झाला होता ब्लेडनं हल्ला, नेमकं घडलं काय?

कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांचा आवडता शो आहे. कित्येक वर्षांपासून चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या ‘कौन बनेगा करोड़पती’ या कार्यक्रमाला आता आणखी लोकप्रियता मिळाली आहे. सध्या हा कार्यक्रम 13 वर्षांचा प्रवास पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे.

काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाच्या 13 व्या पर्वाची शानदार सुरुवात झाली. 2000 या वर्षात सुरु झालेल्या या कार्यक्रमात पहिल्याच वर्षी, काही प्रश्नांची उत्तरे देऊन करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या हर्षवर्धन नवाथे (Harshvardhan Nawathe) यांनी पहिले करोडपती होण्याचा मान मिळवला होता. करोडपती होण्याचं स्वप्न अनेक जणांनी उराशी बाळगलं आणि नवाथे यांचं ते स्वप्न साकार झालं.

Advertisement

सेलिब्रिटीइतकी लोकप्रियता हर्षवर्धन नवाथे यांनी करोडपती होऊन रातोरात मिळवली. ऑटोग्राफ देण्यापासून बातम्यांमध्येच काय तर एव्हाना सगळीकडेच त्यांचं नाव येण्यापर्यंत चर्चा रंगू लागली. पण, प्रसिद्धीच्या या झोतात त्यांना काही वाईट प्रवृत्तीची माणसंही भेटली, ज्यांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अशा व्यक्तींमुळं हर्षवर्धन यांना धक्काच बसला आहे.

ब्लेडने हातावर वार केला, आणि….

Advertisement

हर्षवर्धन नवाथे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते एका कार्यक्रमात जात होते, त्यांना सहभागी व्हायचं होतं पण तिथे तिथं फार गर्दी होती. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे मित्र अंगरक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत होते. पण ते एका ठिकाणी अडकल्यामुळे नवाथे यांच्यासोबत त्यांना राहता आलं नाही.

हर्षवर्धन नवाथे हे जेव्हा स्टेजवरुन खाली उतरत होते, तर तेव्हा त्यांना गर्दीमुळे त्यांचे मित्रही दिसेनासे झाले. त्यावेळी उपस्थित असलेले बहुतेक चाहते नवाथे यांच्याशी कुतूहलानं हात मिळवत होते. आणि घडायचं ते घडलंच, कोणी अज्ञात व्यक्तीने हात मिळवता मिळवता कधी ब्लेडने वार केला, हे हर्षवर्धन नवाथे यांना देखील तेव्हा समजलं, जेव्हा हाताला काहीतरी ओलसर लागल्याचं त्यांना जाणवलं, तेव्हा हा प्रकार समजला.

Advertisement

हर्षवर्धन नवाथे यांनी सांगितल्याप्रमाणं, त्यांनी जेव्हा ओलसर लागल्यावर त्यांचा हात मागे खेचला, तर त्यातून रक्त वाहत होतं. हात रक्ताने भरला होता. हा धक्कादायक प्रकार पाहता सर्वजण बाजूला केले गेले. त्यांनी पाहताच दिसलं की, कोणीतरी त्यांचा हात ब्लेडनं कापला आहे. अशी एकच नाही, तर नवाथे यांच्यासोबत अशा काही घटना कित्येक वेळा घडल्या होत्या.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement