SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसाठीही अनुकंपा धोरण लागू..! ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं काय झालं..?

राज्यातील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. ठाकरे सरकारने शासकीय सेवेतील गट ‘अ’ आणि गट ‘ब’ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीतही अनुकंपा धोरण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज (ता. 26) घेतला. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

सध्या शासकीय सेवेतील गट ‘क’ किंवा गट ‘ड’ दर्जाच्या कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास, त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येत होती. मात्र, आता सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुकंपा धोरण लागू केले आहे.

Advertisement

राज्यातील अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना कोरोना काळात आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीही अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी अधिकाऱ्यांच्या संघटनांनी केली होती.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या (गुरुवारी) बैठकीत अधिकाऱ्यांच्या मागणीवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची सूचना दिली. या निर्णयामुळे अधिकाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

आतापर्यंत शासकीय सेवेतील गट ‘क’ किंवा गट ‘ड’ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाच हा निर्णय लागू होता. या गटातील कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास, त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येत होती.

गट ‘क’ किंवा गट ‘ड’मध्ये नियुक्ती देणार
आता गट ‘अ’ किंवा गट ‘ब’ मधील अधिकाऱ्यांसाठीही अनुकंपा धोरण लागू झाले आहे. त्यानुसार एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे अकस्मात निधन झाल्यास, त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट ‘क’ किंवा गट ‘ड’मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येणार आहे.

Advertisement

अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम 2021 तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अनुकंपासंदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होतील, असे सांगण्यात आले.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा अणि मिळवा संधी iPhone10 जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement