SpreadIt News | Digital Newspaper

बिग बाॅसच्या घरात तुफान राडा..! हाणामारीत एक स्पर्धक गंभीर जखमी, नेमकं काय घडलं पाहा..?

नेहमीच चर्चेत असणारा रियॅलिटी शो, म्हणजे ‘बिग बॉस’.. यंदा टीव्हीपेक्षा काही आठवडेआधी ‘ओटीटी’वर, म्हणजे ‘वूट’ (Woot) वर हा शो सुरू झालाय. निर्माता–दिग्दर्शक करण जोहर यंदा हा शो होस्ट करीत आहे.

बिग बॉस नि वाद, हे समीकरण काही नवे नाही. बिग बाॅसच्या घरात होणारे वाद, भांडणे, आरडा-ओरडा सर्वमान्य झाले आहेत. मात्र, आता हे वाद विकोपाला जाऊ लागले आहेत. हिंसक होत आहेत. स्पर्धकांमध्ये चक्क हाणामारी होऊ लागल्याने या शोबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालेय.

Advertisement

बिग बॉसच्या घरातून स्पर्धक जीशान खानला अचानक बाहेर काढल्याचे बुधवारी (ता. 25) प्रसारित झालेल्या भागात दिसले. त्यामुळे नेमकं कशामुळे जीशानला घराबाहेर काढले, याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. आता त्याचे खरे कारण समोर आले आहे.

नेमकं काय घडलं..?
एका टास्कदरम्यान प्रतिक सहजपाल व निशांत भट्ट यांच्यासोबत जीशानचा खटका उडाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की त्यांच्यात चक्क हाणामारी सुरु झाली. त्यात जीशानला काही जखमा झाल्या आहेत. त्यानंतर बिग बाॅसने या प्रकरणात जीशानलाच दोषी ठरवून त्यास तातडीने घराबाहेर काढले.

Advertisement

कार्यक्रमातून ‘एलिमिनेट’ झाल्यानंतर, बिग बाॅसच्या घरात नेमकं काय झालं, याबाबत जीशानने सोशल मीडियावर आपबिती कथन केली आहे. तसेच, बिग बॉसच्या घरात झालेल्या हाणामारीमुळे झालेल्या दुखापतीचा फोटोही त्याने शेअर केलाय.

जीशानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या फोटोत त्याला झालेली दुखापत दिसते. फोटोंसोबत त्याने हात जोडणारा इमोजी पोस्ट केलाय. तसेच, निशांत व प्रतिकसोबत झालेल्या हाणामारीचा व्हिडिओही त्याने ‘वूट’च्या इन्स्टाग्रामवरील अधिकृत अकाऊंटवर शेअर केला आहे.

Advertisement

 

View this post on Instagram

 

Advertisement

A post shared by Zeeshan Khan (@theonlyzeeshankhan)

Advertisement

दरम्यान, जीशानला घराबाहेर काढल्याने त्याचे चाहते नाराज झालेत. प्रेक्षक, युझर्सनी बिग बॉसचा निर्णय चुकीचा असून, जीशानला न्याय देण्याच्या मागणी होत आहे. जीशान व प्रतिक यांच्यात भांडण झाले, मग शिक्षा केवळ जीशानलाच का? प्रतिकला का घराबाहेर काढले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

बिग बाॅसच्या घरातून जीशानला असे अचानक बाहेर काढल्याने मिलिंद गाबा व दिव्या अग्रवाल नाराज झाले आहेत. दिव्यासोबत जीशानचे छान बाँडिंग जमले होते. जीशान घराबाहेर गेल्याने दिव्या उदास झाली.

Advertisement

जीशानने ‘कुमकुम भाग्य’ मालिकेत काम केले आहे. ‘बिग बॉस’च्या घरात त्याने बाथरोब घालून प्रवेश केला होता. मात्र, आता प्रेक्षकांच्या मागणीनुसार, जीशानला परत ‘बिग बॉस’च्या घरात घेतले जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा अणि मिळवा संधी iPhone10 जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement