जगातील बदलत्या काळात आणि नोकरीच्या दिवसांत सेवानिवृत्तीच्या वेळी रिटायरमेंटच्या वेळी एक चांगला फंड असणे आता खूप महत्वाचा झाला आहे. बहुतेक सरकारी नोकऱ्यांमध्येही आता पेन्शन जवळपास मिळतच नाही असं झालं आहे. परंतु जर तुम्ही अचूक ठिकाणी अचूक मार्गाने गुंतवणूक केली तर तुमची निवृत्ती अधिक चांगली होऊ शकते.
जर दीर्घकालीन गुंतवणूक हुशारीने आणि योग्य मार्गाने केली गेली तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत काही कोटी रुपयांचा फंड खूप सहजपणे तयार होऊ शकतो. परंतु यासाठी योग्य वेळी गुंतवणूक सुरू करणे आवश्यक आहे. बहुतेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांच्या मासिक SIP मध्ये गुंतवणूक (Investment) करतात.
वय 25 वर्षे, मग गुंतवणूक सुरू करणं योग्य?
टॅक्स एक्सपर्टच्या मते, जर एखादा इन्व्हेस्टर त्याच्या वयाच्या 25 व्या वर्षी एसआयपीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करत आहे आणि तो निवृत्तीपर्यंत गुंतवणूक करतो, तर तो संपूर्ण 35 वर्षे सतत गुंतवणूक करतो. यामुळे गुंतवणूकदाराला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. तसेच सेवानिवृत्तीच्या वेळी मोठा निधी तयार होतो.
गुंतवणुकीवर 12 ते 16 टक्के परतावा शक्य?
दुसर्या कर तज्ज्ञाच्या मते, जर तुम्ही 30 वर्षे गुंतवणूक केली तर तुम्हाला गुंतवणुकीवर 12 ते 16 टक्के परतावा मिळतो. एखादी व्यक्ती 30व्या वर्षापासून म्युच्युअल फंडात पुढील 30 वर्षांसाठी 5000 रुपये गुंतवत असेल तर वयाच्या 60 वर्षी त्याला 1,76,49,569 रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. हा अंदाजित आकडा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 12 टक्के व्याजाच्या हिशोबानुसार आहे.
एखाद्याला इतक्या गुंतवणूकीवर 15 टक्के व्याज (Interest Rate) मिळालं, तर त्यानुसार, एकूण रिटर्न 3,50,49,103 रुपये असेल. तसंच 10 टक्के व्याजानुसार 5000 रुपये प्रतिमहिना गुंतवणुकीवर 30 वर्षांनंतर एकूण 1,13,96,627 रुपये रिटर्न (Return) मिळेल.
उत्पन्न वाढलं की गुंतवणूकही वाढवा
एखाद्या 25 वर्षाच्या युवकानं 500 रुपयांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू केली तर दर 6 महिन्यांनी त्याला ही रक्कम 500 रुपयांनी वाढवावी लागेल. याप्रमाणे 5 वर्षांनंतर म्हणजे वयाच्या 30व्या वर्षी ही रक्कम 5000 रुपयांपर्यंत वाढेल. तसंच सुरुवातीच्या 2 वर्षांत गुंतवणुकीतून मिळणारे रिटर्न्स पाहता तुमचा यासाठी उत्साह देखील वाढेल. म्युच्युअल फंड बाजारातील जोखमीवर अवलंबून असतात. म्हणून निधीची निवड अत्यंत काळजीपूर्वक केली पाहिजे. योग्य फंडाची (Fund) निवड केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews