SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धक्कादायक.! राजस्थानात मिग-21 विमान कोसळले, बिहारमध्ये बिघडलेल्या हेलिकाॅप्टरमुळे चुकला काळजाचा ठोका..!

राजस्थानातील बाडमेर जिल्ह्यात भारतीय वायूसेनेचे ‘फायटर जेट मिग-21 बायसन’ क्रॅश झाले. वेळीच विमानातून उडी घेतल्याने पायलट बालंबाल बचावला. झोपड्या व कच्च्या घरांवरुन विमान घसरत गेल्याने घरांना आग लागली. स्थानिक नागरिकांनी माती नि पाणी टाकून आग आटोक्यात आणली.

दुसरीकडे, बिहारमधील बक्सर परिसरात हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. लँडिंग अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र, पायलटने यशस्वीरित्या त्याचे लँडिंग केले.

Advertisement

राजस्थानात मिग-21 फायटर जेट क्रॅश
राजस्थानमधील बाडमेरमध्ये वायू दलाच्या मिग-21 विमानाने आज (ता. 25) नेहमीच्या रुटीनप्रमाणे उड्डाण केले होते. मात्र, काही वेळातच ते कोसळले. हा अपघात होण्यापूर्वीच पायलट बाहेर पडल्याने बचावला. त्यात तो किरकोळ जखमी झाला असला, तरी त्याची प्रकृती ठिक असल्याचे समजते.

जेट विमान ज्या ठिकाणी क्रॅश झाले, तेथे काही झोपड्या व कच्ची घरे होती. विमान त्यावरून घसरत गेल्याने या घरांना आग लागली. मात्र, नागरिकांनी माती व पाणी टाकून आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Advertisement

दरम्यान, या घटनेबाबत ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस व वायू दलाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते.

बिहारमध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
बिहारमधील बक्सर भागात हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. अलाहाबादहून बिहटासाठी हेलिकाॅप्टरने उड्डाण केलं होतं. मात्र, उड्डाणानंतर काही मिनिटांतच त्यात तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले.

Advertisement

बिहारमधील माणिकपूरमधील एका हायस्कूलच्या मैदानात हेलिकॉप्टर उतरविण्याचा निर्णय पायलटने घेतला. पावसामुळे या मैदानात पाणी व चिखलही झालेला होता. मात्र, पायलटने सगळे कसब वापरुन या मैदानात हेलिकॉप्टरचे लँडिंग केलं. हेलिकॉप्टरची चाके चिखलात रुतल्याने किरकोळ नुकसान झाले.

हेलिकॉप्टरमध्ये 20 जण होते. पैकी दोघे वर्ग एकचे अधिकारी, तर इतर कॉन्स्टेबल, सैनिक आणि एसआय दर्जाचे कर्मचारी होते. हे सगळे सुखरूप असून, हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम सुरु झाले होते.

Advertisement

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा अणि मिळवा संधी iPhone10 जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement