SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अजय देवगणचीही होणार तुफान एन्ट्री! येत्या काही दिवसांत ‘या’ 10 वेबसीरिज धमाका करणार..

कोरोनाच्या काळात अनेक चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर होते. पण थिएटर्स बंद होती. आता OTT Platform मध्ये बरेच अभिनेते-अभिनेत्री आपले नशीब आजमावू पाहत आहे. येणार काही दिवसांत कोणत्या वेबसिरीज तुमच्या भेटीला येणार आहेत ते जाणून घ्या..

Advertisement

1) कोटा फॅक्टरी (Kota Factory) – TVF ची ही वेबसीरिज अतिशय लोकप्रिय झाली आहे. जितेंद्र कुमार, मयुर मोरे,एहसास चन्ना आणि रेवती पिल्लई यांच्या प्रमुख भूमिका असलेली टीव्हीएफची या वेबसीरिजने तरुणाईवर चांगलीच जादू केली आहे. या सीरिजचा दुसरा सिझनही आता काही दिवसांतच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Advertisement

2) रूद्र (Rudra) – अनेक हिट चित्रपट देणारा अजय देवगण (Ajay Devgan’s Rudra Webseries) आता ‘रूद्र’ या वेबसीरिजद्वारे डेब्यू करत आहे. अजय देवगणची ही वेबसीरिज डिज्ने+ हॉटस्टारवर (Disney+Hotstar) पाहायला मिळणार आहे. यामध्ये अजयसोबतच काम केलेल्या ‘बादशाहो’ चित्रपटातील अभिनेत्री इलियाना डिक्रूज (Ileana D’Cruz) ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Advertisement

3) फाइंडिंग अनामिका (Finding Anamika) – नृत्यात पारंगत अशी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिचाही डेब्यू होत आहे. ती फाइंडिंग अनामिका या वेबसीरिजमधून प्रेक्षकांना भेटीला येत आहे. नेटफ्लिक्सवर येणाऱ्या या वेब सीरिजमध्ये संजय कपूर (Sanjay Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Advertisement

4) असूर 2 (Asoor-2)- अर्शद वारसी, अमेय वाघ, रिद्धी डोगरा यांच्या अभिनयाने मोठा चाहतावर्ग निर्माण करणारी वेबसीरिज ‘असूर 2’ ही लवकरच रिलीज होणार आहे. या वेबसीरिजचा पहिला सीझन खूपच गाजला होता. आता वूटवर (Voot) याचा दुसरा सीझन येत आहे.

Advertisement

5) दिल्ली क्राईम 2 (Delhi Crime Season 2) – या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये शेफाली शाहची शानदार अ‍ॅक्टिंग (Acting) आपल्याला पाहायला मिळाली असेलच. आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नेटफ्लिक्सवर हा सीझन पाहता येणार आहे.

Advertisement

6) हुश-हुश (Hush Hush) – खूप वर्षांनी अभिनयात उतरणारी व OTT प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच येणारी जुही चावला ही आयशा जुल्का सोबत हूश -हूश या वेब सीरिजमधून बघायला मिळणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राईमवरच्या (Amazon Prime) वेब सीरिजमध्ये जुही व आयशाशिवाय कृतिका कामरा, सोहा अली खान यादेखील असणार आहेत.

Advertisement

7) मिसमॅच्ड 2 (Mismatched-2) – रोहित सराफ, प्राजक्ता कोळी, रणविजय सिंघ, विद्या मालवडे यांचा अभिनय असलेली ‘मिसमॅच्ड’ ही वेबसीरिज चाहत्यांना खूप आवडली होती. आता याचा सेकंड सीझनही तुमच्या भेटीस येतोय.

Advertisement

8) लिटिल थिंग्ज (Little Things-4) – नेटफ्लिक्सवरची Mithila Palkar आणि Dhruv Sehgal यांचा अभिनय असणारी ‘लिटिल थिंग्ज’ ही लव्हस्टोरी चांगलीच गाजली होती. आता याच लव्हस्टोरीचा पुढील पार्ट अर्थात ‘लिटिल थिंग्स 4’ नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Advertisement

9) ये काली काली आंखे (Yeh Kaali Kaali Ankhei)- मालिकांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली श्वेता त्रिपाठी आणि ताहीर राज भसीन यांची मुख्य भूमिका असलेली ही सायकॉलॉजिकल थ्रीलर वेबसीरिजच नेटफ्लिक्सवर (Netflix) प्लॅटफॉर्मवर येणार आहे.

Advertisement

10) कोड एम 2 (Code M 2) – लवकरच जेनिफर विंगेट (Jennifer Winget), रजत कपूर (Rajat Kapoor) व तरूण विरवानी (Tarun Virwani) यांच्या ‘कोड एम’ या वेबसीरिजचा दुसरा सिझन तुम्ही अल्ट बालाजीवर (ALT BALAJI) पाहू शकणार आहात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement