अफगाणिस्तानवर तालिबानने वर्चस्व मिळविल्यानंतर अनेक नागरिक अफगाणिस्तान सोडत आहेत. त्यासाठी विविध देशांनी आपली विमाने अफगाणिस्तानात पाठवली आहेत. त्याच वेळी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी अफगाणिस्तानात गेलेल्या युक्रेनच्या विमानाचे अपहरण करण्यात आलेय. युक्रेनचे परराष्ट्रमंत्र्यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे.
आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी रविवारी (ता. 22) युक्रेनचे विमान काबुलमधील हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते, मात्र काही अज्ञात लोकांनी या विमानाचे अपहरण करुन ते इराणला नेल्याचे वृत्त समोर येत आहे.
Ukrainian plane hijacked in Kabul — deputy minister:https://t.co/ArkDjQXSRY pic.twitter.com/7cxeVSs5YI
Advertisement— TASS (@tassagency_en) August 24, 2021
युक्रेनचे उप परराष्ट्रमंत्री येवगेनी येसेनिन यांनी रशियन वृत्तसंस्था ‘TASS’ला याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की युक्रेनच्या नागरिकांना अफगाणिस्तानातून मायदेशी आणण्यासाठी आम्ही विमान पाठविले होते. मात्र, काबुल विमानतळावर काही अज्ञात लोक विमानात चढले व त्यांनी हे विमान इराणच्या दिशेने नेले.
युक्रेनच्या विमानाचे रविवारी काही अज्ञातांनी अपहरण केले होते. ते आज (मंगळवारी) इराणला नेण्यात आले. आमचे एअरलिफ्टचे तीन प्रयत्न अयशस्वी ठरले असून, आमचे लोक काबुल विमानतळापर्यंतही पोहोचू शकत नसल्याचे उप परराष्ट्रमंत्री येसेनिन यांनी सांगितले.
दरम्यान, युक्रेनच्या विमान अपहरणाच्या दाव्यावर इराणचे मंत्री अब्बास असलानी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, युक्रेनचे हे विमान ईशान्य इराणमधील मशहाद विमानतळावर आले होते. इंधन भरल्यानंतर ते युक्रेनसाठी रवाना झाले. नंतर हे विमान कीव (Moldova) विमानतळावर उतरल्याचे ते म्हणाले.
युक्रेनच्या विमानाचे अपहरण करणारे अज्ञात लोक शस्त्रसज्ज होती. आतापर्यंत ८३ जणांना काबूलहून कीवपर्यंत आणले असून, त्यात युक्रेनच्या ३१ नागरिकांचा समावेश आहे. अफगाणिस्तानात अजूनही युक्रेनचे जवळपास १०० नागरिक असून, त्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पंजशीर प्रांत अजूनही स्वतंत्र्यच
दरम्यान, तालिबानने जवळपास सर्वच अफगाणिस्तानवर ताबा मिळविला असला, तरी पंजशीर प्रांत अजूनही स्वतंत्र आहे. चारही बाजूने डोंगराळ भाग असणाऱ्या या प्रांतात तालिबान विरोधातील आवाज बुलंद होत आहे.
अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह, अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद आणि बल्ख प्रांताचे माजी राज्यपाल मोहम्मद नूर यांच्याकडे नेतृत्व आहे. अमरुल्लाह सालेह यांनी स्वत:ला अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घोषीत करून तालिबानला एकप्रकारे आव्हानच दिले आहे.