SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

..आणि त्या प्रसिद्ध खेळाडूने आपल्या बहिणीशीच केलं लग्न!; नेमकं प्रकरण काय?

आपल्याला जवळजवळ सर्वांनाच माहीत आहे की, आजकाल आपण नेमकं कोणत्या वयात लग्न (Wedding) करायला हवं यासाठी आपण खरंच जबाबदारी घेण्याइतपत मॅच्युअर आहोत का हा विचार केला जातो. ही एक चांगली गोष्ट आहे. तसेच तुम्हाला वय जास्त असतानाही लग्न केलेलं जोडपं दिसलं असेलच, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, एका नात्यानं सध्या अख्ख्या जगाचं लक्ष वेधलं आहे.

पोर्तुगालचा फेमस मोटरसायकल रेसर मिगुएल ओलिवेरा (Miguel Oliveira) यानं कमालच केली आहे. ती म्हणजे त्याने त्याची सावत्र बहीण आंद्रिया पिमेंटा (Andreia Pimenta) हिच्यासोबतच विवाह केला आहे आणि दोघांनी स्वतःच्या होकाराने एकमेकांना स्विकारत नव्या नात्याला सुरुवात केली आहे.

Advertisement

View this post on Instagram

Advertisement

A post shared by MiguelOliveira88 (@88migueloliveira)

Advertisement

वयाच्या 13 व्या वर्षापासून दोंघंही एकमेकांवर प्रेम करत होते. मागील 11 वर्षे त्यांनी आपलं नातं घरच्यांपासून आणि बाहेरील जगापासून लपवून ठेवलं होतं, पण शेवटी त्यानंतर 2019 सालामध्ये त्यांनी पहिल्यांदाच या नात्याचा अधिकृत स्वीकार केला आहे.

प्राप्त माहीतीनुसार, आंद्रिया पिमेंटा ही मिगुएल ओलिवेराचे वडील पाओलो यांची दुसरी पत्नी क्रिस्टीना यांची मुलगी आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट करून आपल्या नवीन नात्याचा खुलासा स्वतःच करून याची माहिती सर्वांना दिली.

Advertisement

सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाची बातमी देणाऱ्या या जोडीवर सध्या सर्वच स्तरांतून शुभेच्छा तर काही ठिकाणाहून नाराजी व्यक्त करण्यात आली असली, तरीही अशा आश्चर्यकारक गोष्टीबाबत कुतूहलही व्यक्त करण्यात येतंय.

आता आणखी विशेष म्हणजे लग्नाच्या बातमीसोबतच मिगुएलनं आपली पत्नी आंद्रिया गरोदर आहे, हेही जगजाहिरपणे सांगितले. सोशल मीडियावर लोकांना या एकाच वेळेस मिळणाऱ्या दोन बातमी देताना त्यानं अल्ट्रासाऊंड स्नॅपही शेअर केला आहे. मागच्य़ा वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये या जोडीनं साखरपुडा करत लग्नासाठीचं एक पाऊल उचललं होतं. त्यावेळी त्याच्या वडिलांनीही या बातमीवर आनंदाची प्रतिक्रिया दिली होती.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement