SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दडी मारलेल्या पावसाचे परत आगमन कधी? वाचा हवामानाचा अंदाज..

मागील आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी हलक्या सरी कोसळल्यानंतर राज्यात पुन्हा मान्सूननं ब्रेक घेतला आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून राज्यात रिमझिम पाऊस सुरु होता. मात्र, पावसाने आता पुन्हा दडी मारली आहे.

राज्यात यंदा नंदुरबार, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rain) झाला आहे. तर अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, सातारा, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

Advertisement

आता मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या चार जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून पुढील 24 तास वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे; पण आज महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (Weather Update) वर्तवला आहे.

राज्यात कुठे किती पाऊस?

Advertisement

▪️ यंदाच्या वर्षात राज्यातल्या एकाही जिल्ह्यात 60 % हून अधिक पाऊस झालेला नाही. तर केवळ 9 जिल्ह्यात 20 ते 59% पाऊस झाला आहे.

▪️ लातूर, हिंगोली, नंदूरबार, धुळे,जळगाव, बुलडाणा, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची टक्केवारी खूपच कमी आहे.

Advertisement

▪️ पुणे, सांगली, अहमदनगर, सोलापूर, नांदेड, वाशिम, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान आता मागील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी रिपरिप पाऊस झाल्यानंतर आता राज्यात पुन्हा पावसानं दडी मारली आहे. पुढील 5 ते 10 दिवस जवजवळ राज्यात पावसाची उघडीपच राहील, तसेच सप्टेबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचं कमबॅकही होऊ शकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक के एस होसाळीकर यांनी मांडला आहे.

Advertisement

राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पावसाच्या जा-ये च्या खेळामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान आता महाराष्ट्रात काही ठिकाणी जास्त पाऊस तर काही ठिकाणी दुष्काळ अशी वेगळी परिस्थिती झाली असून दोन्ही भागातील शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement