सध्याच्या भारतीय संघाच्या फिटनेसची चर्चा जगभरात होते. अर्थात त्याचे सारे श्रेय जाते, कॅप्टन विराट कोहलीला…! जगातील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटूंपैकी एक विराट आहे. व्यायामासह आहार-विहारावर लक्ष दिल्यानेच विराटने ही शारीरिक चपळता मिळविली आहे.
खरे तर सेलिब्रटीच्या खासगी जीवनाबाबत, म्हणजेच तो काय खातो, काय पितो, कसा राहतो, याची प्रत्येकालाच उत्सुकता लागलेली असते. त्यातून विराट कोहलीसारखा स्टार सेलिब्रिटी तरी कसा सुटणार..? चला तर मग विराटच्या आहार-विहाराबाबत, व्यायामाबाबत जाणून घेऊ या..!
विराट आपल्या फिटनेसला किती महत्व देतो, हे सगळ्यांना माहिती आहे. भारतीय फिट अॅण्ड फाईन राहावा, यासाठी ‘यो यो टेस्ट’ची संकल्पनाही विराटचीच..! सध्याच्या घडीला भारतीय संघातील तो सर्वात फिट खेळाडू आहे.
तंदुरुस्तीसाठी विराट जीममध्ये तास न् तास घाम तर गाळतोच, शिवाय त्याने त्याचा डाएट अगदी व्यवस्थित प्लॅन केलेला आहे. काहीही झाले, तरी तो त्यात बदल करीत नाही. त्यासाठीच तो शाकाहारी बनला.
आपल्या आहारात विराट ‘वेगन डायट’ घेतो. म्हणजे, प्राण्यांपासून मिळणारा कुठलाही पदार्थ तो आहारात घेत नाही. अगदी दुधही नाही. वनस्पतीजन्य आहारच तो घेतो. आपल्या खाण्या-पिण्याबाबत तो अतिशय शिस्तबद्ध आहे. त्याचाच परिणाम त्याच्या फिटनेसवर नि खेळातही दिसतो.
विराटच्या फिटनेसमागे आणखी एक गुपित लपलेले आहे. कदाचित फार कमी लोकांना माहीत असेल, की विराट कोहली आपल्यासारखे सामान्य पाणी पित नाही, तर तो काळे पाणी, अर्थात ‘ब्लॅक वॉटर’च पितो. या पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यात नैसर्गिक काळे अल्कधर्मी पदार्थ असतात.
हे पदार्थ शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही. आपले शरीर जास्त काळासाठी हायड्रेटेड ठेवण्यासाठी हे पाणी मदत करते. ‘ब्लॅक वॉटर’मध्ये पीएच मोठ्या प्रमाणात असल्याने ते शरीराला जास्त काळ हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.
शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे
ब्लॅक वाॅटर तयार करण्यासाठी त्यात ब्लॅक मिनरल्सचा वापर केला जातो. त्यामुळे पाण्याचा रंगही काळा होतो. या पाण्यात 70 टक्के खनिजे टाकलेली असतात. त्यामुळे साध्या पाण्यापेक्षा हे अधिक हेल्दी असते. या पाण्यात शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे असतात. बीपी, डायबेटिस, हाय कोलेस्टोरोलसाठी ही पाणी फायदेशीर असते.
विराट कोहली जे ‘ब्लॅक वॉटर’ पितो ना, त्या पाण्याची किंमत कितीय माहिती का, 3000 ते 4000 रुपये प्रति लिटर..! विराटशिवाय बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला, मलायका अरोरा, श्रूती हसन यांसह इतर अनेक सेलिब्रिटीदेखील फिट राहण्यासाठी ‘ब्लॅक वॉटर’च पित असल्याचे सांगण्यात आले.