SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रवि शास्री यांच्यानंतर त्यांचाच भिडू होणार टीम इंडियाचा कोच, राहुल द्रविडची माघार..

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-२० वर्ल्डकपनंतर संपुष्टात येत आहे. त्यामुळे रवि शास्री यांच्यानंतर कोच कोण होणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

रवी शास्त्री सध्या टीम इंडियासोबत इंग्लड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या भविष्याबाबत चर्चा करण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह हेही लंडनमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, रवि शास्री यांनीच आता कोच म्हणून काम करण्याची इच्छा नसल्याचे बीसीसीआयला कळविले आहे.

Advertisement

रवि शास्री यांच्यानंतर टीम इंडियाचा कोच म्हणून ‘दी वाॅल’ राहुल द्रविड याची निवड करण्याची मागणी होत होती. मात्र, स्वत: द्रविड या पदासाठी फारसा इच्छूक नसल्याचे दिसते. त्याने पुन्हा एकदा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या ( NCA) प्रमुखपदासाठीच अर्ज केला आहे.

राहुल द्रविड कोच पदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने आता रवि शास्री यांच्या जागी कोण येणार, असा सवाल उपस्थित होत असताना एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. रवी शास्त्री यांच्या जागी त्यांच्याच टीममधील भीडूच विराजमान होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

Advertisement

राठोड यांचे नाव आघाडीवर
रवी शास्री यांचा हा भिडू म्हणजे, भारतीय संघाचे सध्याचे फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांचे नाव पुढील मुख्य प्रशिक्षक म्हणून समोर येत आहे. राठोड हेच सध्या टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले जाते.

रवी शास्त्री यांच्यासोबत राठोड हे अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. शिवाय त्यांचे कर्णधार विराट कोहली याच्यासोबतही चांगले जुळते. त्यामुळे सध्या तरी त्यांचेच नाव आघाडीवर आहे. राठोड यांच्या कार्यकाळातच टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली होती.

Advertisement

१९९६-९७ मध्ये राठोड यांनी भारताकडून ६ कसोटी व ७ वन-डे सामने खेळले आहेत. स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्येही त्यांनी १४६ सामन्यांत ४९.६६च्या सरसरीनं ११४७३ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यांनी ९९ सामन्यांत ३०००हून अधिक धावा केल्या आहेत.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement