SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अभिनेत्री क्रिती सेनाॅनला करायचंय ‘या’ हिरोसोबत लग्न..! तर ‘या’ हिरोबरोबर तिला जायचंय डेटवर..

बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींमध्ये आता क्रिती सेनॉनचं नाव घेतलं जातं. दमदार अभिनय, निरागस सौंदर्य नि नृत्याची असणारी जाण, यामुळे फार कमी काळात तिनं कोणतीही पार्श्वभूमी नसताना बॉलिवूडमध्ये आपले बस्तान बसविले. स्वतःची वेगळी ओळख तयार केली. अनेक हीट चित्रपट दिले.

बाॅलिवूड असो वा टाॅलीवूड, क्रितीने आजवर वेगवेगळ्या अभिनेत्यांसोबत काम केलंय. आपल्या ‘बोल्ड अॅंण्ड ब्युटिफूल’ अंदाजामुळे ती नेहमीच ‘पेज थ्री’वर झळकत असते. सोशल मीडियातही ती माेठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह असते. त्यावर तिचे मोठ्या संख्येने फाॅलोअर्सही आहेत.

Advertisement

टायगर श्राॅफ याच्यासोबत ‘हिरोपंती’ चित्रपटातून क्रितीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नंतर ‘लुकाछुपी’ चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत दिसली. येत्या काळात ती प्रभाससोबत ‘आदिपुरूष’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

‘इंडिया टुडे ई- माइंड रॉक्स-२०२१’मध्ये क्रिती सेनॉन हिने अलिकडेच सहभाग घेतला होता. त्यात तिला फ्लर्ट, डेटिंग आणि लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आले. सहसा कोणत्याही वादात न पडणाऱ्या क्रितीने या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली.

Advertisement

एका ‘रॅपिड फायर राउंड’मध्ये क्रितीला विचारले, की प्रभास, टायगर श्रॉफ व कार्तिक आर्यन यांच्यापैका तुला कोणासोबत फ्लर्ट, कोणाला डेट, तर कोणासोबत लग्न करायला आवडेल? या प्रश्नावर सुरवातीला क्रिती काहीसी गोंधळलेली दिसली; मात्र नंतर लगेच सावरत तिनं बिनधास्तपणे उत्तर दिलं.

टायगरला डेट करण्याची इच्छा
क्रिती म्हणाली, की ‘मला कार्तिक आर्यनसोबत ‘फ्लर्ट’ करायला, तर टायगरला ‘डेट’ करण्याची इच्छा आहे. लग्न मात्र प्रभासशी करायला आवडेल, असे क्रिती म्हणाली.

Advertisement

क्रितीचे आगामी चित्रपट
क्रिती सेनाॅन हिच्या हातात सध्या अनेक मोठ्या बॅनर्सचे चित्रपट आहेत. काही दिवसांपूर्वीच तिने ‘भेडिया’ चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले. त्यात ती वरुण धवन याच्यासोबत दिसणार आहे. शिवाय तिचे ‘आदिपुरुष’, ‘बच्चन पांडे’, ‘हम दो – हमारे दो’ आणि ‘गणपत’ हे चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement