SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सैराटसारखा धमाका पुन्हा होणार; ‘इतक्या’ कोटींना विकले गेले नागराज मंजूळेंच्या ‘झुंड’ चित्रपटाचे OTT राइट्स!

मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजूळे (Nagraj Manjule) यांच्या ‘झुंड’ या चित्रपटाची फॅन्स वाट पाहत आहेत. पण हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार की नाही यावर अद्यापही गूढ कायम आहे. महाराष्ट्राचे फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांचा हा बायोपिक असणार आहे.

चित्रपटाचे ओटीटी राइट्स 33 कोटींना विकले?

Advertisement

सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘झुंड’ (Sairaat movie director Nagraj Popatrao Manjule’s Zund) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. महाराष्ट्राचे फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे (Vijay Barse Biopic) यांच्यावर आधारित हा बायोपिक आहे.

‘झुंड’मध्ये बरेच प्लस पॉइंट आहेत, परंतु व्यावसायिक व्यवहार्यता देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे केवळ 25% नाही तर त्यापेक्षा जास्त कमाई एकट्या महाराष्ट्रातून होऊ शकते. महाराष्ट्रातील चित्रपटगृहे अद्याप बंद आहेत, त्यामुळे निर्माते संभ्रमात आहेत. दरम्यान महाराष्ट्राबाहेर तेलंगणा व्यतिरिक्त,अनेक ठिकाणी आता 50% क्षमतेने थिएटर्स खुले झाले आहेत.

Advertisement

महाराष्ट्रात चित्रपटांच्या कमाईसाठी हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज होणे जास्त महत्त्वाचे आहे. कथा, दिग्दर्शक आणि व्यावसायिक कोण हे सर्व लक्षात घेऊन हा चित्रपट महाराष्ट्राच्या प्रेक्षकांशिवाय देशाच्या इतर भागांमध्ये रिलीज करण्याचा कोणताही विशेष फायदा होणार नाही.

दरम्यान प्राप्त माहीती अशी की, 20 कोटींमध्ये हा चित्रपट बनवला गेला आहे आणि हा चित्रपट आधीच 33 कोटींना विकला गेला आहे. त्यामुळे व्यावसायिक धोका (Commercial Risk) कमी झाला आहे.

Advertisement

महाराष्ट्रातील चित्रपटगृहे उघडण्यास जर आणखी विलंब झाला ‘झुंड’ हा अमिताभचा दुसरा चित्रपट असेल, जो थेट ओटीटीवर प्रदर्शीत केला जाईल. याआधी अमिताभ यांचा ‘गुलाबो सिताबो’ ओटीटीवर रिलीज करण्यात आला होता. तर लवकरच बिग बींचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र हा चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार आहे. बेल बॉटम आणि चेहरेच्या निर्मात्यांनी महाराष्ट्रातील कमाई सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि इतर राज्यातील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित केला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement