SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कायनेटिक लुना आता इलेक्ट्रिक रुपात येणार, स्वस्तात मस्त-रेंजही जबरदस्त, पाहा ही वैशिष्ट्ये..!

1970 ते 1980 च्या दशकात मोटारसायकल खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. अशा काळात थोडीफार बरी आर्थिक परिस्थिती असणारे लोक सायकल कम स्कूटर असणारी कायनेटिक लूना खरेदी करून हौस भागवत. अगदी 50 CC असणाऱ्या या मोपेडला पॅडलही होते.

दरम्यान, कालांतराने स्पर्धेच्या युगात ही मोपेड मागे पडली. इतर कंपन्यांच्या स्कूटर बाजारात आल्यावर ही मोपेड बंद झाली. मात्र, आता पुन्हा नव्या रुपात ही मोपेड येत आहे. मोठ्या कालावधीनंतर कायनेटिकने (Kinetic) भारतीय बाजारात कमबॅक केले आहे.

Advertisement

भारतीय ग्राहकांची गरज ओळखून अनेक ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर लॉंच करीत आहेत. भारतातही इलेक्ट्रीक वाहनांचा बाजार फुलू लागला आहे. रोज कोणती ना कोणती कंपनी, स्टार्टअप इलेक्ट्रीक व्हेईकल लाँच करीत आहेत.

इलेक्ट्रिक स्कूटरच्या या बाजारात आता ‘कायनेटीक’ची एन्ट्री होणार आहे. भारतीय रस्त्यांवर पुन्हा एकदा लूना मोपेड धावताना दिसणार आहे. कायनेटिक कंपनी एकेकाळच्या आपल्या पॉप्युलर लुना मोपेडला पुन्हा एकदा इलेक्ट्रिक अवतारात लॉंच करणार आहे.

Advertisement

ओला, सिंम्पल, होंडा, हिरोनंतर तुमच्या आमच्या सर्वांची लाडकी कायनेटीक लुना मोपेड आता इलेक्ट्रीकमध्ये येत आहे. लवकरच भारतीय बाजारात ती लाँच केली जाणार आहे. या स्कूटरची किंमत वाजवी असेल, शिवाय बॅटरी रेंजदेखील चांगली असल्याचे सांगितले जात आहे.

कायनेटीक इलेक्ट्रिक लुनाची वैशिष्ट्ये
– कायनेटिक लुना इलेक्ट्रिक मोपेडमध्ये 1 kW ताकद निर्माण करण्यासाठी Lithium-ion बॅटरी पॅक असेल, जी सिंगल चार्जमध्ये 70-80 किलोमीटरची रेंज देईल.
– मोपेडचा सर्वाधित वेग हा 25 किमी प्रति तास असू शकतो.

Advertisement

– मोपेडची किंमत 50000 रुपयांच्या आत असू शकणार आहे. त्यामुळे ग्रामीण व निमशहरी भागातही स्कूटर वापरता येईल. तसेच, खिशालाही परवडणारी असेल.
– इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट, एलईडी हेडलाइट्स, डीआरएल, डिजिटल इंस्ट्रूमेंन्ट कंसोल, यूएसबी चार्जसह अनेक फिचर्स या मोपेडमध्ये असणार आहेत.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement