क्रिकेटचा विश्वचषक २०११ आठवला, तरी भारतीय चाहत्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो, तो शेवटचा क्षण.. भारतीय संघाचा त्यावेळचा कॅप्टन एम. एस. धोनी याने वानखेडे स्टेडियमवर अंतिम सामन्यात खेचलेला विजयी षटकार… या विजयामुळे भारताने २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वचषकावर नाव कोरले होते.
भारताच्या या विजयाला यंदा १० वर्षे पूर्ण झाली. महेंद्रसिंह धोनी यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता एक वर्ष होत आलेय. मात्र, तरीही धोनीची क्रेझ कमी झालेली नाही. जाहिरातीपासून ते धोनीच्या हेअर स्टाईलपर्यंत प्रत्येक गोष्टींची सर्वत्र जोरदार चर्चा होतेच.
विश्वचषक 2011च्या अंतिम सामन्यात धोनीने ज्या बॅटने षटकार ठोकून भारताला जिंकवलं होतं, त्या बॅटचा काही दिवसांपूर्वी लिलाव करण्यात आला. क्रिकेटच्या इतिहासातील ती सर्वात महाग बॅट समजली जाते.
धोनीच्या त्या बॅटच्या किंमतीची नोंद ही ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये देखील झाली आहे. धोनीच्या या बॅटला ‘ग्लोबल शेअर अँड सिक्युरिटी लिमिटेड कंपनी’ने 161, 295 डॉलर्स (जवळपास 1 कोटी 20 लाख) पेक्षा जास्त किंमतीमध्ये खरेदी केलंय.
दरम्यान, आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा पुढील महिन्यात १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होत आहे. महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघ सध्या या स्पर्धेची तयारीला लागला आहे.
आयपीएल मोसमातील उरलेल्या 31 मॅच 27 दिवसांमध्ये होणार आहेत. हे सगळे सामने युएईतल्या दुबई, अबुधाबी, शारजाह या तीन स्टेडियममध्ये खेळवले जातील, तर फायनल 15 ऑक्टोबरला दुबईमध्ये होणार आहेत.