SpreadIt News | Digital Newspaper

‘अमूल’सोबत व्यवसाय करण्याची संधी..! दरमहा होणार लाखो रुपयांची कमाई, काय करावे लागणार, वाचा..

कोरोना संसर्गातून आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे या काळात तुम्ही एखादा नवा उद्याेग-धंदा सुरु करण्याचा विचार करीत असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. अमूल या डेअरी प्रोडक्ट कंपनीसोबत व्यवसाय करण्याची संधी असून, त्यातून दरमहा बंपर कमाई करता येणार आहे.

छोट्या गुंतवणुकदारांसाठी ‘अमूल’ने फ्रेंचाइजी देण्याचा निर्णय घेतला आहे. अमूल रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंगची फ्रेंचाइजी ऑफर करण्यात आली आहे. त्यासाठी अगदी 2 ते 6 लाख रुपयांच्या भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येणार आहे.

Advertisement

‘अमूल’ने नव्या गुंतवणुकदारांसाठी दोन प्रकारच्या फ्रेंचाइजी आणल्या आहेत. अमूल आऊटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा क्योस्कची फ्रेंचाइजी असे त्याचे स्वरुप आहे. त्यासाठी साधारण 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल.

नॉन रिफंडेबल ब्रॅंड सिक्योरिटी अंतर्गत 25 हजार रुपये, तसेच रिनोव्हेशनला 1 लाख रुपये, इक्विपमेंन्टवर 75 हजार रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

तसेच अमूल आइसक्रीम स्कूपिंग पार्लरच्या फ्रेंचाइजीसाठी सुरवातीला 5-6 लाख रुपये खर्च करावे लागतील. त्यात ब्रॅंड सिक्युरिटीसाठी 50 हजार रुपये, रिनोव्हेशनसाठी 4 लाख रुपये, इक्विपमेंन्टसाठी 1.50 लाख रुपये लागणार आहेत.

महिन्याला 5 ते 10 लाख रुपये कमाई
अमूल फ्रेंचाइजीच्या माध्यमातून महिन्याला 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. त्यात मिल्क पाऊच 2.5 टक्के, मिल्क प्रोडक्टवर 10 टक्के, तर आइसक्रीमवर 20 टक्के कमिशन मिळणार आहे.

Advertisement

अमूल आइसक्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचाइजी घेतल्यास रेसिपी बेस्ड आइसक्रीम, शेक, पिज्जा, सॅंडविच, हॉट चॉकलेट, ड्रिंकवर 50 टक्के कमीशन मिळते. तसेच प्री-पॅक आइसक्रीमवर 20 टक्के आणि अमूल प्रोडक्टवर कंपनी 10 टक्के कमीशन देते.

अमूल आऊटलेटसाठी 150 स्केअर फूट जागा असेल तरच फ्रेंचाइजी मिळेल. आइसक्रीम पार्लरसाठी कमीत कमी 300 स्केअर फूट जागा असणे गरजेचे आहे.

Advertisement

अमूलकडून एलईडी सायनेज दिले जातील. सर्व इक्विपमेंट आणि ब्रॅंडिंगवर सबसिडी मिळणार आहे. इनोग्रेशन सपोर्ट, तसेच जास्त निगोशिएट केल्यास मोठी सूट दिली जाणार आहे. पार्लर बॉय वा मालकाला ट्रेनिंग दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

असे करा अप्लाय
फ्रेंचाइजीसाठी [email protected] वर मेल अर्ज करता येईल. तसेच या लिंकवरच संपूर्ण प्रोसेस समजणार आहे.

Advertisement

 

Advertisement