SpreadIt News | Digital Newspaper

राज्यातील शाळा कधी सुरु होणार..? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले महत्वपूर्ण संकेत, पाहा ते काय म्हणाले..?

राज्यातील शाळा कधी सुरु होणार, याबाबत सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. राज्य सरकारने 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे आता शाळा कधी सुरु होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या शाळा दिवाळीनंतरच सुरू करणार असल्याचे सांगितले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की गणेशोत्सवानंतर राज्यातील कोरोना परिस्थितीचा पुन्हा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर शाळेसंदर्भातला निर्णय घेतला जाईल.

Advertisement

दरम्यान, कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले, की सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता, आत्ताच्या घडीला तरी दिवाळीपर्यंत शाळा चालू करू नये, या मताचे आम्ही आहोत. मात्र, शेवटी याबाबतचा अंतिम निर्णय राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील.

शिक्षण समिती, तसेच काही पालक शाळा सुरु करण्याबाबत आग्रही आहेत. त्यांची बाजूही रास्त आहे. कुठेतरी या मुलांची बौद्धिक वाढ खुंटण्याची भीती आहे. पण आरोग्य सगळ्यात महत्वाचे आहे. त्यामुळे आम्हाला कोणताही चान्स घ्यायचा नसल्याचे डाॅ. ओक यांना स्पष्ट केले.

Advertisement

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यात लहान मुलांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या रोज सरासरी 110 मुले कोरोनाबाधित निघत आहेत. आतापर्यंत 6 लाख 78 हजार मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement