SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अफगाणिस्तानातून 168 भारतीयांची सुटका, इतर नागरिकांना आणण्यासाठी भारताने केलेय हे नियोजन..

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अनेक नागरिकांनी देश सोडण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानात असलेले इतर देशांचे नागरिकही आपआपल्या मायदेशात परतत आहेत.

अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी काबुल विमानतळावर लोकांची गर्दी होत आहे. शनिवारी (ता. २१) पहाटे काबूल विमानतळावरुन काही भारतीय नागरिकांचे अपहरण झाल्याचे वृत्त आले होते. मात्र, सगळे भारतीय सुखरूप असून, ते भारतात परतत आहेत.

Advertisement

भारतीय वायुदलाच्या C-17 विमानाने आज (रविवारी) सकाळी 168 भारतीय वायुदलाच्या गाझियाबादच्या हिंडन बेसवर आणण्यात आले. त्या आधी एअर इंडियाने शनिवारी (ता. २१)  87 भारतीयांना नवी दिल्लीत सुखरुप आणले होते. आतापर्यंत २५० भारतीयांची सुटका करण्यात आली आहे.

काबुलमध्ये 150 भारतीयांच्या अपहरणाचे वृत्त समोर आल्यावर भारतीयांची अफगाणिस्तानातून सुटका करण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग आला. या कामात ताजिकिस्तानमधील भारतीय दूतावास महत्वाची भूमिका बजावत आहे. एअर इंडियाच्या विमानात बसताच, भारतीय नागरिकांनी ‘भारत माता की जय’ असा एकच जल्लोष केला.

Advertisement

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी रविवारी ट्विटद्वारे माहिती दिली. नेपाळच्या दोन नागरिकांनाही विमानातून आणण्यात आले. इतर भारतीयांनाही मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज रात्रीपर्यंत इतर 300 भारतीयांना सुखरूप परत आणले जाणार असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रत्येक देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. भारतानेही आपले नागरिक परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. हवाई दलाच्या विमानांनी भारतीय नागरिकांना परत आणले जात आहे.

Advertisement

अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित घर वापसीसाठी भारत सरकारने दररोज दोन उड्डाणे चालविण्यास परवानगी दिली आहे. अफगाणिस्तानमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात भारतीय अडकले असून, सगळ्यांनी सुरक्षितरित्या भारतात आणले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement