SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

प्रेरणादायक! ‘त्याने’ कलेक्टरची नोकरी सोडली आणि ‘हे’ काम करून उभं केलं 14,000 कोटींचं साम्राज्य..

देशातील युवा उद्योजक रोमन सैनी देशातील गरीब मुलांना नागरी सेवा परीक्षेची ऑनलाईन तयारी करण्यासाठी मदत करतात. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी त्यांनी आयएएस बनून आपल्या पालकांचा गौरव वाढविला आणि अचानक जेव्हा त्याने सुमारे सहा वर्षांपूर्वी आयएएस नोकरी सोडली आणि त्याने स्वत: च्या Unacademy कंपनीची पायाभरणी केली. हा थक्क करणारा प्रवास जाणून घ्या..

Unacademy कंपनीत कोणाचा सहभाग..?

Advertisement

‘अनअ‍ॅकॅडमी’ या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफार्म स्टार्ट अपची नोंदणी माजी आयएएस राहिलेले रोमन सैनी (Roman Saini) गौरव मुंजाळ व हिमेश सिंग यांनी 2015 मध्ये केली. सध्या अनेक विद्यार्थी या ऑनलाईन कोचिंग सुविधेचा लाभ घेतात. ऑनलाईन शिकण्यासाठी पैसे देऊन त्याचा लाभ घेणार्‍यांची संख्या आजपर्यंत 4 लाखांच्याही पुढे गेली आहे. येथे 15 हजारांपेक्षा जास्त शिक्षक आज ऑनलाईन ट्युटोरिअल क्लासेस घेतात.

देशात 18 वा रँक: माजी आयएएस (IAS) रोमन सैनी हे राजस्थानच्या कोटपुतलीमधील रायकरनपूरचे राहणारे आहेत. रोमन सैनींच्या आई गृहिणी आहे तर वडील इंजिनियर आहेत. एमबीबीएस पूर्ण केल्यावर रोमन सैनी यांनी एनडीडीटीसीमध्ये (NDDTC) कनिष्ठ रहिवासी म्हणून काम केले. ते वयाच्या 23 व्या वर्षी प्रशासकीय सेवक बनले. त्यावेळी IAS परीक्षेत संपूर्ण देशात 18 वा क्रमांक मिळवला होता.

Advertisement

रोमन सैनी यांना असं वाटतं की, देशात अशी काही मुलं आहेत जी अभ्यासात हुशार आहेत, पण कमी खर्चात शिक्षण त्यांना मिळत नाही आणि मार्गदर्शनाचा अभाव असल्याने त्यांची तयारी अपुरी राहते. अशा अनेक समस्यांमुळे ते स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत. म्हणून रोमनने ठरवले की तो अशा तरुणांना मोफत ऑनलाईन कोचिंगद्वारे मदत करेल. त्यासाठी रोमन सैनीने ‘Unacademy’ सुरू केली. ही एक ऑनलाईन कोचिंग वेबसाईट तसेच App आहे. जे ते त्यांचा मित्र गौरव मुंजाल यांच्यासोबत चालवतात. रोमन आता त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोफत कोचिंग देत आहे ज्यांची नागरी सेवेत रुजू होण्यासाठी इच्छा आहे.

रोमनने देशातील युवकांच्या चांगल्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी Unacademy सुरू केली. रोमन सैनीच्या अनअ‍ॅकॅडमीचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. सध्या Unacademy चे व्हॅल्यूएशन 14,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. Unacademy हे एक ऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्म आहे, जिथे IAS सह 35 वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. Unacademy यूट्यूब आणि अनअ‍ॅकॅडमी तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

Advertisement

अधिक माहीतीसाठी तुम्ही Unacademy चे अ‍ॅप इंस्टॉल करू शकता 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.unacademyapp

रोमन मदत करत आहे :- रोमनने त्याच्या मित्रांसह गरीब विद्यार्थ्यांसाठी UNACADEMY नावाची संस्था सुरू केली. त्यांनी ऑनलाईन कोचिंग सुरू केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. Unacademy WiFi, Prep Ladder, Code Chef, Mastery सारख्या कंपन्या एक्वॉयर केल्या आहेत. या व्यतिरिक्त, Unacademy हा IPL चा देखील अधिकृत पार्टनर राहिला आहे. यूट्यूबवर रोमन सैनीच्या व्हिडिओंमधून हजारो विद्यार्थी मार्गदर्शन घेतात.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement