SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहशतवादावर आधारित ‘हे’ जबरदस्त चित्रपट तुम्हाला माहीती आहेत का?

▪️ 12 स्ट्रॉंग (12 Strong) – अमेरिकेत झालेल्या 9/11 च्या हल्ल्यानंतर बलाढ्य अमेरिकेने अफगाणिस्तान देशातील तालिबानचा प्रमुख तळ हल्ला करून कसा उध्वस्त केला, हे या चित्रपटात दाखवलं आहे. तर या चित्रपटात ख्रिस हेम्सवर्थ (‘थॉर’ नावाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध झालेला अभिनेता) मुख्य भूमिकेत, मायकेल शॅनन, मायकेल पेन यांच्या दमदार भूमिका आहेत. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपटआहे.

▪️ लोन सर्व्हाइव्हर (Lone Survivor) – या चित्रपटात जून 2005 मधील एका घटनेचे चित्रण आहे, ज्यात अमेरिकन सैन्य दल कुख्यात तालिबान नेता अहमद शाह याला पकडण्यासाठी गेले होते. तिथे पुढे अनेक घटना घडतात. या चित्रपटात मार्क वाहलबर्ग हा अभिनेता मुख्य भूमिकेत आहे.

Advertisement

▪️ द आउटपोस्ट (The Outpost) – अफगाणिस्तानमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर अनेक तालिबानी दहशतवादी अचानक हल्ला करतात, असं या चित्रपटात दाखवलं आहे. हा चित्रपट 2019 साली रिलीज झाला. या चित्रपटात या दरम्यान, अमेरिकन सैन्याची छोटी तुकडी अनेक तालिबान्यांशी लढल्याचं दाखवलं आहे.

▪️ झिरो डार्क थर्टी (Zero Dark Thirty) – 2012 साली आलेल्या या चित्रपटात कुख्यात दहशतवादी ओसामा बीन लादेनच्या तपासापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंतची स्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Advertisement

▪️ रेस्ट्रेपो (Restrepo) – टीम हेथरिंग्टन यांचं दिग्दर्शन असलेला हा डॉक्‍युमेंटरी चित्रपट आहे. हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला. अफगानी युद्धावेळी एका अमेरिकन सैनिकाचा युद्ध अनुभव चित्रपटात अतिशय सुरेख दाखवला आहे. अमेरिकेने जशी चूक व्हिएतनाममध्ये केली, अगदी तशी चूक अफगाणिस्तानमध्येही केल्याचं यात दाखवलं आहे.

▪️ रॅम्बो (Rambo) – हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलोन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. यात आपल्याला अफगाणिस्तानची जुनी कथा पाहायला मिळते. जेव्हा सोव्हिएत युनियनचे जेव्हा अफगाणिस्तानवर आक्रमण होते, तेव्हा चित्रपटात नायक एका मिशनवर निघतो आणि सोव्हिएत सैन्यापासून त्याच्या मित्राची सुटका करायची असते

Advertisement

▪️ द डिक्‍टेटर (The Dictator) – या चित्रपटात अलादीन नावाचा जो एक हुकूमशहा असतो, तो अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांना आश्रय देत आहे. त्याच वेळी, तो एका गुप्त आण्विक मोहिमेवरही काम करत आहे. ज्याचा हेतू इस्रायलवर हल्ला करणे आहे. हे सर्व घडताना पाहून संयुक्‍त राष्ट्राची सुरक्षा परिषद या प्रकरणी हस्तक्षेप करते आणि अलादीनला यूएन मुख्यालयात संबोधित करण्यासाठी बोलावले जाते. तुम्हाला या चित्रपटात अनेक गंमतीशीर विनोदही पाहायला मिळतील. पुढे काय होते, हे पाहणे उत्कंठावर्धक आहे.

हे सर्व चित्रपट आपल्याला कुठे फ्रिमध्ये तर कुठे ठराविक शुल्क भरून पाहायला मिळतील. जसे की, काही OTT Platform म्हणजेच Netflix, Amazaon Prime Video, Disney+ Hotstar इ. सारख्या आणि Youtube वरही तुम्ही हे चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement