SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वाढलेल्या वजनाची लाज वाटतेय..! मग पाहा सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टच्या तीन महत्वाच्या टिप्स, नेमकं काय म्हटलेय..?

शरीराचे वजन वाढले, की मनावरचे वजनही वाढू लागते; मग काहींना दिवसाही सडपातळ झाल्याची स्वप्ने पडू लागतात. वजन कमी करण्यासाठी अनेक जण अनेक सल्ले देतात. मग त्यातला कोणता सल्ला मानावा, असे होऊन जाते नि मनाचा एकच गोंधळ उडतो.

कोरोनामुळे लॉकडाऊन काळात अनेक जण घरातच बसून होते. शरीराची हालचाल थांबल्याने या काळात बऱ्याच जणांच्या वजनाचेही आकडे फुगल्याचे पाहायला मिळाले. वजन कमी करायचं म्हणजे, जिभेला लगाम नि नियमित व्यायाम, या दोन गोष्टी तर सगळ्यांनाच माहिती आहेत.

Advertisement

मात्र, वजन कमी करण्यासाठी आणखीही काही गोष्टी समजून घेणं गरजेचे आहे. याबाबत सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट असणाऱ्या ऋजूता दिवेकर यांनी शरीराच्या वजनाविषयी सोशल मीडियावर ३ महत्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यांनी नेमकं काय सांगितलंय, हे जाणून घेऊ या..

फिटनेसचं अचूक चित्र हे वजन नाही
ऋजुता दिवेकर म्हणतात, की “अनेकदा आपण शरीराचं वजन, चरबीच्या प्रमाणाला (जाड किंवा बारीक दिसण्याला) फिटनेस मोजण्याचं परिमाण समजू लागतो. मात्र, हे चुकीचं आहे. तुमच्या वजनाचा आकडा खाली येत नसला, तरी बिलकुल निराश होऊ नका.”

Advertisement

Advertisement

शरीरातील बदल हे पूर्णपणे वजनावरच अवलंबून नसतात. शरीराच्या वजनात स्नायू, चरबी, हाडं आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण यांचा समावेश होतो. त्यामुळे फिटनेसचं अचूक चित्र हे वजन असू शकत नसल्याचे दिवेकर यांचे म्हणणे आहे.

त्या म्हणाल्या, की ‘एका दिवसात शरीराच्या वजनात काही ग्रॅम किंवा किलोपर्यंतचा चढ-उतार होऊ शकतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण बदलल्यामुळे हा फरक दिसू शकतो. सकाळी आपल्या शरीराचं वजन रात्रीपेक्षा थोडं कमी असतं.’

Advertisement

शरीराचे वजन कितीही असले, तरी ती व्यक्ती निरोगी असू शकते. मात्र, त्यासाठी शारीरिक हालचाल त्या प्रमाणात असावी. वजनाची चिंता न करता, रोज नियमित व्यायाम, संतुलित आहार घेणे महत्वाचे असल्याकडे दिवेकर यांनी लक्ष वेधले आहे.

शरीराच्या वजनात काही प्रमाणातील चढ-उतार होत असतील, तर त्याची काळजी करण्यासारखं काही नाही. मात्र, त्याचे प्रमाण खूप जास्त असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा, अशी सूचना दिवेकर यांनी केली आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement