SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘त्या’ विमानातून पडलेला तो अफगाणी तरुण प्रसिद्ध फुटबॉलपटू, मृत्यूनंतर झालं उघड!

तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर मिळेल त्या मार्गाने काही नागरिकांनी देश सोडून जायचा प्रयत्न सुरु केला. या संबंधी अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काही काळातचं तालिबान (Taliban) सक्रिय झाले. अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा तालिबानने ताबा घेतला.

प्रकरण काय?

Advertisement

काही दिवसांपूर्वी या विमानाला लटकलेल्या दोघांचा हजारो फूट खाली पडून मृत्यू झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. खाली पडलेल्या दोघांपैकी एक अफगाणिस्तानच्या नॅशनल फुटबॉल टीमचा खेळाडू असल्याचे म्हटले जात आहे. प्राप्त माहितीनुसार या फुटबॉलपटूचे नाव झाकी अन्वर (Zaki Anwari) असे आहे.

झाकी अनवारी हा काबुलमधील हामिद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Karzai International Airport in Kabul) देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या हजारो अफगाणी नागरिकांपैकी एक होता. सोमवारी झाकी अनवारी याचा काबूल विमानतळावर अमेरिकेच्या लष्करी C-17 विमानावरून (C-17 aircraft of the US Air Force) पडून मृत्यू झाला आहे.

Advertisement

अफगाणच्या इतर नागरिकांप्रमाणे झाकी अन्वर काबुलहून अमेरिकेला जाणाऱ्या विमानाच्या विंगला कवटाळून बसला होता. विमान उड्डाण करण्याच्या वेळेस झाकी अनवारी त्यावर चढला. मात्र झाकी अनवारी त्या विमानावरून खाली पडला. दरम्यान जनरल डायरेक्टरेटने या खेळाडूच्या मृत्यूच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

झाकीच्या मृत्यूची घोषणा (The famous Afghan young footballer zaki anwari died) अफगाणिस्तान राष्ट्रीय फुटबॉल संघाने 18 ऑगस्ट रोजी फेसबुक पोस्टद्वारे केली होती. तसेच, दुसऱ्या दिवशी क्रीडा संचालनालयाने या घटनेला दुजोरा दिला. जाकी अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय युवा फुटबॉल टीमचा सदस्य होता.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

 

Advertisement