SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू..! लोखंडी सळई घेऊन जाणारा ट्रक उलटला..!

बुलडाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर तळेगाव शिवारात लोखंडी सळई घेऊन जाणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात तब्बल 13 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मुंबई ते नागपूर दरम्यान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम मोठ्या वेगात सुरू आहे. हा संपूर्ण महामार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. या महामार्गाच्या कामासाठी ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर आणले आहेत.

Advertisement

बुलडाणा जिल्ह्यात सध्या समृद्धी महामार्गाच्या कामाला वेग आला आहे. या कामासाठीच लोखंडी सळई व 16 मजूरांना घेऊन हा ट्रक जात होता. सिंदखेडराजा तालुक्यातील तळेगाव–दुसरबीडमध्ये समृद्धी कॅम्पजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले.

गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झालेल्या चिखलातून ट्रक घसरला आणि रस्त्याच्या कडेला पलटी झाला. ट्रकमधील लोखंडी सळई अंगावर पडून 13 मजूरांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन मजूर गंभीर जखमी झाले.

Advertisement

जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. समृद्धी महामार्गावर काम करणारे हे बिहारी मजूर असल्याची माहिती मिळाली.

स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने पोलिसांनी मजूरांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. अपघातग्रस्त ट्रक हटविण्याचे काम सुरु होते. हे मृत मजूर परराज्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातातून एक लहान मुलगी सुदैवाने बचावली.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement