SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तालिबानचा भारताला मोठा झटका; करोडो-अब्जो रुपयांची गुंतवणूक पाण्यात जाणार?

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पूर्वीचे निर्णय आणि धोरणे यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवल्यानंतर भारताबरोबरचा आयात-निर्यातीचा व्यापार (import-export trade) बंद केला आहे.

भारतीय निर्यात संघटनेचे संचालक डॉ. अजय सहाय म्हणाले..

Advertisement

तालिबानने सध्या पाकिस्तानमार्गे होणारी मालवाहतूक (cargo) बंद केली आहे. तालिबानने पाकिस्तानच्या हवाई मार्गाने होणारी कार्गो वाहतूक थांबवली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातून माल येणं बंद झालं आहे, असं फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक (FIEO) अजय सहाय यांनी सांगितले.

अफगाणिस्तानातील घडामोडींवर आमचे बारीक लक्ष आहे. तिथून पाकिस्तानमार्गे सामान आपल्याकडे येते. तालिबानने सध्या पाकिस्तानमार्गे होणारी मालवाहतूक बंद (Taliban stopped exports, imports from India) केली आहे. त्यामुळे आयात थांबली आहे. भविष्यात तालिबानी प्रशासक काय निर्णय घेतात, याकडे आमचे लक्ष राहील. लवकरच आयात-निर्यात सुरू करण्यावर भर दिला जाईल, असे अजय सहाय यांनी सांगितले.

Advertisement

अफगाणिस्तानात भारताचे 400 प्रकल्प:

वर्ष 2021 मध्ये या कालावधीत भारताने अफगाणिस्तानात 835 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तिथून 510 कोटीपेक्षा जास्त मूल्याच्या वस्तू आयात केल्या आहेत. एवढेच नव्हे तर भारताने मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानात गुंतवणूक केली आहे.

Advertisement

अफगाणिस्तानात आपले 400 प्रकल्प (400 projects) आहेत. गुंतवणुकीचा हा आकडा तब्बल 22 हजार कोटी रुपयांच्या घरात जातो. त्यातले काही प्रकल्प सध्या सुरु आहेत. दुबईमार्गे होणारी आयातही सध्या सुरळीत आहे. भारतातून होणाऱ्या निर्यातीमध्ये चहा, कॉफी, साखर, औषधे, मसाले यांची समावेश असून, आयातीमध्ये जास्त करून ड्राय फ्रूट्सचा समावेश आहे.

भारतात होणाऱ्या सुकामेव्याच्या एकूण आयातीपैकी 85 टक्के हिस्सा अफगाणिस्तानमधून आयात केला जातो. अफगाणिस्तानमधून सुमारे 38 हजार टन सुकामेव्याची भारतात आयात होते. गेल्या आर्थिक वर्षात (2020-21) भारताने 3753.47 कोटींचा माल अफगाणिस्तानातून आयात केला. त्यापैकी 2389 कोटी रुपये सुकामेव्यासाठी होते. ही गोष्ट लक्षात घेऊन तालिबानी शासकांनी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आयात-निर्यात सुरु ठेवली पाहिजे, असे मत FIEO चे संचालक (Dr Ajay Sahai, Director General of FIEO) अजय सहाय यांनी व्यक्त केले.

Advertisement

150 भारतीय मायभूमीत परतले

काबूलच्या वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या, ज्यात एका टीममध्ये 46 लोक होते. त्यांना 16 ऑगस्टला आणण्यात आले होते. त्याचवेळी, दुसऱ्या टीममध्ये भारताचे राजदूत, 99 आयटीबीपी कमांडो, तीन महिला आणि दूतावास कर्मचारी यांचा समावेश होता. 17 ऑगस्ट रोजी सुमारे 150 लोकांना भारतात आणण्यात आले. 17 ऑगस्ट रोजी सी-17 विमानाने पहाटे 5.30 वाजता उड्डाण घेतले आणि सकाळी 11.15 वाजता गुजरातमध्ये लँड झाले. या ठिकाणी या टीमचं जोरदार स्वागत करण्यात आलं. 56 तास चाललेल्या या संपूर्ण मिशनमध्ये ना कोणाला झोप आली, ना कोणी कोणाच्या गळ्याखाली घास गेला.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement