SpreadIt News | Digital Newspaper

तुमचे बँकेत लॉकर आहे का? मग RBI ने बदललेले ‘हे’ नियम नक्की वाचा..

0

बँक लॉकरमध्ये तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे किंवा सोन्या चांदीचे दागिने ठेवत असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पुढील नव्या वर्षाच्या सुरूवातीला 1 जानेवारी 2022 पासून बॅंक डिपॉझिट लॉकरचे (Bank Deposit Locker) नवीन नियम लागू होणार आहेत.

रिझर्व्ह बँकेनं लॉकर भाड्यानं घेण्यासंबंधित असलेल्या मार्दर्शक सूचनांमध्ये काही बदल केले आहे. नुकतेच आरबीआयने (RBI) त्याबाबतचे नोटीफिकेशन जारी केले आहे. जर तुम्ही लॉकरचा वापर करत असाल तर
ही माहीती जाणून घ्या.

Advertisement

बॅंक लॉकरबाबत बदललेले नियम कोणते?

▪️ रिझर्व्ह बँकेच्या मते, बँकांना त्यांच्या संचालक मंडळानं मंजूर केलेल्या अशा धोरणांची अंमलबजावणी करावी लागेल, ज्यात निष्काळजीपणामुळे लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंसाठी त्यांची जबाबदारी निश्चित करता येईल.

Advertisement

▪️ नवीन नियमानुसार, शाखानिहाय लॉकर वाटपाची माहिती आणि प्रतीक्षा यादी कोअर बँकिंग प्रणालीशी जोडली जाईल.

▪️ लॉकर वाटपाच्या सर्व अर्जांसाठी बँकांना पावती द्यावी लागेल. जर लॉकर वाटपासाठी उपलब्ध नसतील तर बँकांना ग्राहकांना प्रतीक्षा यादी क्रमांक द्यावा लागेल.

Advertisement

▪️ बँकेचे सध्याचे ग्राहक ज्यांनी लॉकर सुविधेसाठी अर्ज केला आहे आणि जे सीडीडी (Customer Due Diligence) मानकांचे पूर्णपणे पालन करत आहेत, त्यांना सुरक्षित डिपॉझिट लॉकर/सेफ कस्टडी आर्टिकलची सुविधा नियमानुसार दिली जाऊ शकते.

▪️ सेफ डिपॉझिट लॉकर/सेफ कस्टडी आर्टिकलची सुविधा अशा ग्राहकांना दिली जाऊ शकते ज्यांचे बँकेशी इतर कोणतेही बँकिंग संबंध नाहीत.

Advertisement

▪️ बँकांना स्ट्रॉंग रूम किंवा व्हॉल्ट्सची मजबूत सुरक्षा करावी लागेल. लॉकर रूममध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्याचे सीसीटीव्ही फुटेज किमान 180 दिवस ठेवावे लागतील.

▪️ रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्ती किंवा ‘ॲक्ट ऑफ गॉड’ अर्थात भूकंप, पूर, वीज किंवा वादळ झाल्यास कोणत्याही नुकसानीस बँक जबाबदार राहणार नाही.

Advertisement

▪️ आग, चोरी, इमारत कोसळणे वा बँक कर्मचाऱ्यांकडून फसवणूक झाल्यास बँकांचे दायित्व ग्राहकाच्या वार्षिक लॉकर भाड्याच्या 100 पट मर्यादित असेल.

▪️ ग्राहकाने सलग 3 वर्षे भाडे भरले नाही, तर बँक योग्य प्रक्रियेनंतर कोणताही लॉकर उघडू शकते, असेही नव्या नियमात नमूद केले आहे.

Advertisement

▪️ RBI ने जाहीर केलेले नवे नियम सर्व सरकारी, खाजगी,ग्रामीण, पेमेंट बँक तसेच इतर बँकेला पाळावे लागतील.

▪️ ग्राहकांना लॉकरमध्ये काहीही बेकायदेशीर किंवा कोणताही धोकादायक पदार्थ ठेवता येणार नाही. जर बँकेला कोणत्याही ग्राहकाद्वारे सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये कोणत्याही बेकायदेशीर किंवा धोकादायक पदार्थाच्या ठेवीचा संशय आला, तर अशा ग्राहकावर योग्य कारवाई करण्याचा अधिकार बँकेकडे असणार आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement