SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ट्रॅफिकच्या नियमांमध्ये महत्वपूर्ण बदल..! परिवहन मंत्रालयाने उचलले कठोर पाऊल, चालकांवर असा होणार परिणाम..

भारतातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहनचालकांना शिस्त लागून त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी परिवहन मंत्रालय सतत नवनवे नियम करते. नियम मोडणाऱ्यांवर जरब बसावी, यासाठी दंडात्मक कारवाईही करण्यात येते; पण तरीही चालकांना फारसा फरक पडलेला नाही..

वाहतुकीच्या नियम पाळले जात नसल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चालकांनी कसोशीने नियम पाळावेत, यासाठी परिवहन मंत्रालयाने आणखी एक कठोर पाऊल उचललं आहे.

Advertisement

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यांतर्गत सुधारित अधिसूचना जारी केलीय. त्यानुसार आता जर तुम्ही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, तर चालान जारी करण्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक एनफोर्समेंट डिव्हाइस’ (Electronic Enforcement Device) वापरले जाणार आहे.

कशी करणार दंडवसूली..?
एखाद्या चालकाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास, राज्य सरकारच्या वाहतूक विभागाला 15 दिवसांच्या आत नियमभंग करणाऱ्या व्यक्तीला नोटीस पाठवावी लागेल. नियम मोडणाऱ्या व्यक्तीचे चालान (Challan) निकाली निघेपर्यंत, म्हणजेच दंडाची वसुली होइपर्यंत, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जपून ठेवावं लागेल.

Advertisement

नव्या नियमांनुसार, इलेक्ट्रॉनिक एन्फोर्समेंट डिव्हाइसमध्ये स्पीड कॅमेरे, क्लोज-सर्किट टेलिव्हिजन कॅमेरे, स्पीड गन, बॉडी वेअरेबल कॅमेरे, डॅशबोर्ड कॅमेरे, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR), वेट-इन मशीन (WIM) आणि इतर अनेक तंत्रज्ञानांचा समावेश केलेला आहे.

राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गासह महत्त्वाच्या जंक्शनवर, तसेच किमान 10 लाख लोकसंख्या असलेल्या प्रमुख शहरांत हे डिव्हाइस बसविण्याचे आदेश मंत्रालयाने दिले आहेत. अधिक अपघात होणाऱ्या 132 शहरांचा अधिसूचनेत उल्लेख केलेला आहे.

Advertisement

इलेक्ट्रॉनिक एन्फोर्समेंट डिव्हाइस हे सुरक्षित, कोणालाही अडथळा येणार नाही, अशा ठिकाणी बसविण्यात येईल. त्यात लाइन-ऑफ-व्हिजन वा वाहतुकीची योग्य हालचाल रेकॉर्ड होईल, याची खात्री करूनत ते बसविण्यात येणार आहे.

राज्य सरकारवर जबाबदारी
राज्य सरकारवर या डिव्हाइसचे योग्य इन्स्टॉलेशन करण्याची जबाबदारी आहे. हे डिव्हाइस व्यवस्थित काम करीत असल्याची खात्री राज्य सरकारला करावी लागेल. परिवहन मंत्रालयाच्या या तिसऱ्या डोळ्यामुळे चालकांना वाहतूक नियमांचं कटाक्षाने पालन करावे लागेल, हे निश्चित..!

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement