बॉलिवूडमधील एका कपलच्या अफेयरची सध्या जोरदार चर्चा आहे. हे कपल म्हणजे, बाॅलिवुडची टाॅप अभिनेत्री कतरिना कैफ व अभिनेता विकी कौशल..! गेल्या काही दिवसांपासून ही जोडी अनेक पार्ट्या, कार्यक्रमांना एकत्र फिरताना दिसले होते. त्यामुळे चाहत्यांना या दोघांच्या लग्नाचे वेध लागले होते.
अनेक कार्यक्रमात विक्की कौशल व कैतरिना कैफ यांना एकत्र पाहिलं गेलं असलं, तरी त्यांनी कधीही आपल्या नात्याबाबत स्पष्ट खुलासा केला नव्हता. मागील वर्षभरापासून ते एकमेकांना डेट करीत होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ चित्रपटाच्या प्रीमियरलाही दोघे एकत्र आले होते.
दरम्यान, आता कतरिना कैफ व विक्की कौशल यांच्या रिलेशनशिपबाबत एक मोठी बातमी समोर आलीय. ती म्हणजे, या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्यात ‘रोका’ हा विधी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
साखरपुड्याच्या या बातमीवर अजून अधिकृत काहीही सांगण्यात आले नसले, तरी आजच या दोघांचा ‘रोका सेरेमनी’ झाल्याची माहिती बाहेर आली आहे. मात्र, दोघांच्या घराबाहेर कोणतीच सजावट केलेली नव्हती.
अभिनेता रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर गेली काही वर्षे कतरिना सिंगल होती. त्यानंतर तिच्या व विकीच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. विशेष म्हणजे, या दोघांनी कधीही कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही.
अभिनेता अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर हा या दोघांचाही जवळचा मित्र आहे. त्यानेच एका मुलाखतीत विकी व कतरिनाच्या नात्याबाबत भाष्य केलं होतं. त्यामुळे हे दोघे डेट करीत असल्याचे जगजाहीर झाले होते. आता त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.