SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चेक भरण्याआधी ‘ही’ चूक केली, तर होईल दंड!; RBI च्या नियमांत झालेला मोठा बदल वाचा..

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकिंग नियमांमध्ये काही बदल केलेत. बँकेत पेमेंट करण्यासाठी रोख रकमेसह चेक पेमेंट, ऑनलाइन, यूपीआय पेमेंट इ. मार्गांचा अवलंब केला जातो. सध्या जर तुम्ही चेकच्या (Cheque Payment) माध्यमातून पेमेंट करत असाल तर तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक सावध राहावे लागणार आहे.

केंद्रीय बँकेने आता 24 तास बल्क क्लिअरिंग सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता चेक क्लिअर होण्यासाठी 2 दिवसांचा वेळ जाणार नाही. आता चेक बँकेत टाकल्यानंतर त्याची रक्कम त्वरित मिळणार आहे. फक्त चेक देण्यापूर्वी तुम्हाला आपल्या खात्यात पैसे आहेत की नाही, एकदा तपासून पाहावं लागणार आहे.

Advertisement

चेक सातही दिवस क्लिअर होणार

आता NACH आठवड्याच्या सातही दिवस उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे चेकद्वारे पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल. आता ते नॉन वर्किंग डे म्हणजेच साप्ताहिक सुट्ट्या आणि राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशीही काम करणार आहे.

Advertisement

NACH आता आठवड्याचे 7 दिवस आणि 24 तास उपलब्ध असणार आहे. ते 24 तास काम करणार आहे. त्यामुळे आता चेक देण्यापूर्वी खात्यात पैसे आहेत की नाही ते तपासून घेत जा, अन्यथा तुमचा चेक बाउन्स होईल, चेक बाउन्स झाल्यास तुम्हाला पॅनल्टी रक्कम द्यावी लागेल.

NACH म्हणजे नेमकं काय?

Advertisement

मोठ्या प्रमाणावर पैसे भरण्याचे काम NACH द्वारे केले जाते, जे भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे संचालित आहे. या महिन्यापासून नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस (NACH) हे एकावेळी अनेक क्रेडिट ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. या व्यतिरिक्त वेतन, पेन्शन, व्याज, लाभांश इत्यादी मोठ्या प्रमाणात रक्कम दिली जाते. तसेच वीज, गॅस, टेलिफोन, पाणी, कर्जाचा हप्ता, गुंतवणूक, विमा प्रीमियम इत्यादी भरण्याचे काम करते.

Positive Pay System अंतर्गत..

Advertisement

RBI ने चेकवर आधारित व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करण्यासाठी जानेवारीमध्ये सकारात्मक वेतन प्रणाली लागू (Positive Pay System) केली. या प्रक्रियेअंतर्गत चेक जारीकर्ता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने क्लियरिंगसाठी सादर केलेल्या चेकमधून माहिती देतो. Positive Pay System मध्ये 50 हजार रुपयांवरील चेक पेमेंटसाठी चेक नंबर, चेकची तारीख, देणाऱ्याचे नाव, खाते क्रमांक, रक्कम आणि इतर पुष्टीकरण करावे लागेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement