SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तालिबाननं जगाला दिलेली ‘ही’ 10 आश्वासनं नक्की वाचा..

तालिबाननं उत्तर अफगाणिस्तान पूर्णपणे काबिज केल्यावर रविवारी जवळपास संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे, अशी माहीती आहे. मे महिन्यात अमेरिकन सैन्य माघारी परतत होते, तेव्हापासून तालिबान्यांची अफगाणिस्तान बळकावण्याची गती आणखी वाढली व तालिबाननं मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानमध्ये पाय पसरण्यास सुरूवात केली आहे.

तालिबाननं पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर येऊन आपली प्रतिक्रिया दिली. तालिबानचा प्रवक्ता जबिहुल्ला मुजाहिद यानं माध्यमांशी संवाद साधताना (Taliban spokesperson Zabihullah Mujahid addressing the first press conference) आंतरराष्ट्रीय समुदायानं आपल्याला मान्यता द्यावी, अशी प्रमुख मागणी केली आहे. अफगाणिस्तानमध्ये असलेल्या कोणत्याही दुतावासाला आपण नुकसान पोहोचवलं जाणार नसल्याचं आश्वासन देत महिलांना आणि माध्यमांना काही सूट देणार असल्याचंही त्यानं सांगितलं.

Advertisement

तालिबाननं दिली 10 आश्वासने:

▪️ आम्हाला कोणत्याही देशाशी, माजी सैनिक आणि अफगाणिस्तानच्या सरकारचे सदस्य अशा कोणाशीच बदला (Taliban have pledged not to seek revenge) घ्यायचा नाही. अफगाणिस्तानमध्ये कोणीही कोणाचंही अपहरण करू शकणार नाही व जीवही घेऊ शकणार नाही. अफगाणिस्तानची सुरक्षा आता वाढवली जाणार आहे.

Advertisement

▪️ कोणत्याही दुतावासाला किंवा संस्थेला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवलं जाणार नाही तर सुरक्षा पुरवली जाईल. देशातील सर्वच दुतावासांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असंही मुजाहिद यानं सांगितलं.

▪️ अफगाणिस्तानच्या भूमिचा वापर कोणत्याही देशाविरोधात कट रचण्यासाठी आणि हल्ला करण्यासाठी केला जाणार नाही.

Advertisement

▪️ खासगी माध्यमांना वेगळं, स्वतंत्र काम करण्याची निश्चित परवानगी दिली जाईल; पण जे पत्रकार असतील त्यांना अफगाणिस्तानच्या मूल्यांचं पालन करावे लागणार आहे.

▪️ त्यानी असंही म्हटलं की, आमच्यासाठी आता अफगाण युद्ध संपलं आहे. यासोबतच ज्यांनी ज्यांनी आमच्याविरोधात अर्थात तालिबानविरोधात कट-कारस्थाने रचली, युद्ध लढलं अशांना आम्ही आता माफ करत आहोत.

Advertisement

▪️ आम्ही जगाला आश्वासन देतो की, आमचं सर्व सैन्य सर्व दुतावासांचं, आंतरराष्ट्रीय संघटनांचं आणि संस्थांच्या सुरक्षेसाठी उपस्थित असेल, असंही म्हणणं मांडलं.

▪️ जेव्हा काही कालावधीने तालिबानचं स्वतःच चं सरकार अस्तित्वात येईल, तेव्हा नेमकं कोणाला कोणती व कशी सूट आपण देणार आहोत, हे त्यावेळी सांगितलं जाणार असल्याचं त्यानं म्हटलं.

Advertisement

▪️ अफगाणिस्तानातील महिलांना शरिया कायद्याप्रमाणे काही सूट अधिकार प्रदान करण्यात येतील. त्या आरोग्य विभाग व शाळांमध्ये काम करू शकणार आहेत. परंतु प्रसार माध्यमांमध्ये काम करण्याच्या प्रश्नांना त्यांनी पाठ दाखवली.

▪️ तालिबानच्या काळात देशाची अर्थव्यवस्था आणि जीवनमानही उंचावेल, असा प्रयत्न असेल. आमचं प्राधान्य प्रथम कायदा व्यवस्था स्थापन करणं आहे. त्यानंतर लोक या ठिकाणी सुखानं राहू शकतील असंही तालिबानच्या प्रवक्त्यानं म्हटलं.

Advertisement

▪️ तालिबानमध्ये राहणाऱ्या लोकांना कोणीही नुकसान पोहोचवणार नाही. कोणीही तुमचा दरवाजा ठोठावणार नाही, असं आश्वासनही यावेळी देण्यात आलं. तालिबान सरकार स्थापन करणार आहे, कारण यापूर्वीचे सरकार कोणत्याही योग्यतेचं नव्हतं. कोणालाही त्यांना सुरक्षित ठेवत येत नव्हतं. आता तालिबान सर्वांना सुरक्षा पुरवणार असल्याचं आश्वासनही प्रवक्त्यानं दिले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement