SpreadIt News | Digital Newspaper

धक्कादायक..! बाॅलिवूड स्टार हनिट्रॅपच्या जाळ्यात, अनेकांना घातलाय लाखोंचा गंडा, कोण कोण अडकलंय पाहा..!

0

आतापर्यंत आपण ‘हनीट्रॅप’बद्दल खूप काही ऐकले, वाचले, पाहिले आहे. समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना लूटणाऱ्या काही टोळ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केल्याचे समोर आले. मात्र, या प्रकाराचे लोण थेट बाॅलिवूडपर्यंत पोचल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आलाय..!

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने आजवरचे सर्वात मोठे ‘सेस्टाॅर्शन रॅकेट’ समोर आणले आहे. विशेष म्हणजे, त्यात 100 पेक्षा जास्त बॉलिवूड स्टार व काही टीव्ही सेलेब्रिटींची शिकार झाल्याचे तपासात पुढे आले आहे.

Advertisement

रॅकेट चालविणाऱ्यांनी या स्टार मंडळींना लाखो रुपयांचा गंडा घातलाय. एकीकडे त्यांच्याकडून मोठ्या रकमेची खंडणी उकळतानाच, या सेलिब्रेटींचे न्यूड व्हिडिओ ‘डार्क वेब’वरही विकण्यात आले. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे..

पोलिसांनी नागपूर, ओरिसा, गुजरात, कलकत्ता इथून 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पैकी दोघे इंजिनियर, तर एक आरोपी अल्पवयीन आहे. त्यांच्याकडून मिळालेली माहिती फारच धक्कादायक आहे. या टोळीकडे तब्बल 258 जणांचे ‘न्यूड व्हिडिओ’ आढळले.

Advertisement

हे व्हिडीओ व्हायरल न करण्यासाठी या स्टारकडून लाखो रुपयांची खंडणी उकळण्यात आलीये. विशेष म्हणजे, त्यात 100 हून अधिक बॉलिवूड सेलिब्रेटी अडकले असल्याचे समोर आलेय.

कसा घालत गंडा..?
सोशल मीडियावरून बॉलिवूड स्टार, टीव्ही सेलेब्रिटीसोबत जवळीक वाढवली जाते. सावज हेरल्यानंतर त्याची सगळी माहिती गोळा करण्यात येते. सोशल मीडियावरून 6 महिने वा त्यापेक्षा जास्त काळ मैत्री वाढविली जाते. नंतर त्याचे प्रेमात रुपांतर झाले, की शिकार टप्प्प्यात येते.

Advertisement

स्टार लोकांना ‘न्यूड व्हिडिओ’ कॉल करायला सांगितले जाते. त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात येते. नंतर सुरु होतो खंडणीचा खेळ..! लाखो रुपयांची खंडणी उकळली जाते. एकीकडे खंडणी उकळत असताना, ‘डार्क वेब’वर या सेलिब्रिटींचे ‘न्यूड व्हिडिओ’ही विकले गेल्याचे समोर आलेय.

नेपाळमधील एका बँक खात्यात या टोळीने खंडणीची रक्कम जमा केली होती. मुंबई पोलिसांनी नेपाळ सरकारला आरोपींच्या बँक खात्याचे डिटेल्स देण्याची विनंती केलीये. ही माहिती हाती आल्यानंतर या जाळ्यात बॉलिवूडमधील कोणते चेहरे अडकलेत, ते समोर येऊ शकेल..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement