SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमच्या घरातील गॅस सिलेंडर कधी संपणार? ‘ही’ आयडिया वापरून समजणार..

तुम्हाला गॅस सिलेंडर (Gas Cylinder) तर माहीतच असेल, जो आपण घरी स्वयंपाकासाठी वापरतो. कधी कधी तो वापरानुसार लवकरही संपल्यासारखे वाटते तर कधी जास्त दिवस शिल्लक राहतो, असं आपल्याला वाटतं. खरं तर आपण गॅस भरून घेतो तेव्हा तो कमी किंवा जास्तही भेटत नाही, तो नेहमीप्रमाणेच आहे तितकाच भेटत असतो.

अचानक गॅस संपला तर अशा वेळेला गृहीणीची ऐन वेळेला पंचायत होते. मग अशावेळेला ती गृहिणी विचार करते की, गॅस कधी संपणार हे जर मला आधी कळलं असतं, तर किती बरं झालं असतं. म्हणूनच तुम्हाला एक मार्ग माहीत असायला हवा, ज्याने कळेल की, तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे आणि तो अंदाजे किती दिवस आपल्याला पुरेल.

Advertisement

आपण सिलेंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे बघण्यासाठी सिलेंडर उचलून पाहतो. सिलेंडरच्या वजनानुसार त्यात शिल्लक असणाऱ्या गॅसचा आपण अंदाज लावतो. तर असे काही लोक आहेत, ज्यांना जळणाऱ्या गॅसचा रंग निळ्या ते पिवळा होतो तेव्हा सिलेंडरमधील गॅस संपणार असल्याचं समजतं.

परंतु हे फक्त आपण अनुमान लावून ढोबळमानाने करू शकतो, पण त्याचे अचुक उत्तर मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण शेगडीच्या बर्नरमध्ये समस्या असल्यामुळे देखील गॅसच्या ज्योतीचा रंगही बदलतो.

Advertisement

गॅस सिलेंडरमधील शिल्लक गॅस तपासण्याची सोपी पद्धत:

▪️ घरातील ओल्या कापडाच्या मदतीने सिलेंडरमधील शिल्लक गॅस आपल्याला योग्य पद्धतीने समजणार आहे. सर्वात आधी तुम्हाला ओले केलेले कापड घ्यावे लागेल.

Advertisement

▪️ ते ओले कापड तुम्हाला गॅस सिलेंडरला गोल गुंडाळावे लागणार आहे.

▪️ आता 1-2 मिनिटे थांबा, मग ते कापड काढून घडून खाली ठेवा.

Advertisement

▪️ आता सिलिंडरच्या बाहेरून तुम्हाला जाणवेल की, गॅस सिलेंडरचा काही भाग कोरडा, तर काही भाग ओला दिसेल.

▪️ आता असं का घडतं आणि याचा अर्थ काय लावायचा, तर सिलेंडरचा जो रिकामा भाग असेल, तो गरम असतो आणि त्याठिकाणी पाणी पटकन शोषले जाते आणि सुकते.

Advertisement

▪️ सिलेंडरचा ज्या भागात गॅस भरला आहे तो भाग थोडा थंड राहतो आणि त्या ठिकाणी पाणी सुकण्यास थोडा वेळ लागतो.

या पद्धतीने तुम्हाला सहज समजेल की, तुमच्या घरातील गॅस सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे ते, मग त्या अंदाजानुसार गॅस सिलेंडर कधी संपणार हे सुद्धा समजते.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement