SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तालिबान्यांच्या ‘या’ फोटाेत दडलीय मराठ्यांच्या इतिहासातील भळभळती जखम, नेमकं काय कनेक्शन आहे पाहा..?

अमेरिकी सैन्याने माघार घेताच, काही काळातच संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबान या कट्टर दहशतवादी संघटनेने कब्जा मिळविला. अफगाणिस्तानच्या नागरिकांवर देश सोडून पळण्याची वेळ आली. काबूलमधील राष्ट्रपती भवनात तालिबानी घुसले. त्याचे व्हिडीओ, फोटो जगभर प्रसिध्द होत आहेत.

राष्ट्रपती भवनातील एका फोटोने मात्र भारतीयांचे, विशेषत: महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रपती भवनात बसलेल्या तालिबान्यांच्या मागे भिंतीवर लावलेल्या पेंटींगचा मराठ्यांच्या इतिहासाशी थेट कनेक्शन आहे. नेमकं काय आहे या पेंटिंगमध्ये याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

काबूलमधील प्रेसिडेंशियल पॅलेस, अर्थात राष्ट्रपती भवन. अफगाण राष्ट्रपतींचे निवासस्थान. अफगाणी लोक या वास्तूला ‘अर्ग’ (Arg) म्हणतात. सुमारे 34 हेक्टरवर हे राष्ट्रपती भवन पसरलेलं आहे. 1880 मध्ये त्याची उभारणी झाली होती. त्याआधीही या जागेवर एक महाल होता, पण लढायांत तो उद्धवस्त झाला असावा.

तालिबान्यांनी याच राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतल्याचा एक फोटाे मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या फोटोत तालिबान्यांचे म्होरके खुर्चीवर बसले असून, बाजूला तालिबानी अतिरेकी हातात बंदूका घेऊन उभे आहेत. त्यांच्या मागे भिंतीवर एक पेंटिंग लावलेले आहे.

Advertisement

भारताच्या इतिहासाशी, मराठ्यांच्या भावनांशी ही पेंटिंग थेट जोडली गेलेली आहे. महाराष्ट्रातील कित्येक पिढ्यांसाठी खरं तर ती एक भळभळती जखम आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

पेंटींगमध्ये नेमकं काय..?
राष्ट्रपती भवनातील या पेंटींगमध्ये एक सरदार फकिरासमोर झुकून त्याचा आशीर्वाद घेताना दिसतोय. फकिर त्याच्या डोक्यावर अक्षता टाकताेय. शेजारी काही सरदार हातात तलवारी घेऊन उभे आहेत. मागे पर्वतरांगा दिसत आहेत.

Advertisement

फकिरासमोर झुकलेली ही व्यक्ती आहे अहमद शाह दुर्रानी..! मराठ्यांच्या इतिहासात त्याला ‘अहमदशाह अब्दाली’ म्हणून ओळखले जाते. अफगाणिस्तानचा हा पहिला शासक..! अब्दालीच्या राज्याभिषेकाचा प्रसंग या पेंटिंगमध्ये आहे.

Advertisement

अब्दाली नि मराठ्यामध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली होती. त्यात मराठ्यांचा दारुण पराभव झाला, तर अब्दालीचेही मोठे नुकसान झाले होते.

खरं तर अफगाणिस्तान पूर्वीपासून अनेक टोळ्या, कबिले, तांडे यांचा मिळून बनलेला देश आहे. अनेक टोळ्यांमध्ये विखुरलेल्या भूमिवर कुण्या एकाला राजा म्हणून घोषीत केलं जाणं तसं अशक्यच, पण ते अब्दालीनं घडवून आणलं होतं. अब्दाली 1747 मध्ये राजा झाला होता.

Advertisement

कंदहारमध्ये एका मशिदीत 25 वर्षीय अब्दालीचा राज्याभिषेक साध्या पद्धतीने झाला होता. एका फकिराने अब्दालीच्या डोक्यावर गहू अक्षता म्हणून टाकले आणि त्याला राजा म्हणून घोषीत केले. हाच प्रसंग त्या पेंटींगमध्ये रेखाटला गेलाय.

आजचा अफगाणिस्तान अब्दाली याचीच देण आहे. देश म्हणून त्यानेच अफगाणिस्तानला एकत्र आणलं. भारतासाठी लुटारु असलेला अब्दाली अफगाण लोकांसाठी ‘बाबा’ ‘महान’ आहे. त्यामुळेच त्याच्या राज्याभिषेकाचं चित्र अफगाण राष्ट्रपतीच्या निवासस्थानात लागलेलं आहे.

Advertisement

अब्दालीला मराठी माणूस विसरु शकणार नाही. भारत आज बदलला असला, तरी अफगाणिस्तान आजही या टोळ्यांच्याच ताब्यात असल्याचं विदारक चित्रं तालिबान्यांच्या रुपाने समोर आलेय.

 

Advertisement